शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी नवघरे पोटनिवडणुकीने वेधले वाशिमा जिल्ह्याचे लक्ष्य; उत्सूकता शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:44 IST

१३ डिसेंबर रोजी होणा-या पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधले असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. 

ठळक मुद्देप्रचार अंतिम टप्यात तिरंगी लढतीचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : १३ डिसेंबर रोजी होणा-या पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधले असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता  प्रमाणपत्र रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.  संपूर्ण जिल्ह्यात पांगरी नवघरे सर्कलची ही पहिली निवडणूक असावी की ज्या निवडणूकमधे भारिप-बमसं वगळता इतर कोणताही प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात उतरला नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसंग्राम यांचे समर्थन घेऊन मनिषा धनंजय माने या निवडणूक रिंगणात आहेत तर भारिप-बमसंतर्फे लता रमेश अवचार आणि अपक्ष म्हणून संगीता सिद्धार्थ खिल्लारे निवडणूक लढवित आहेत. सध्या राज्य व देशात काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांत घमासान सुरू आहे. खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये झालेल्या मारहाणीवरून काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे तर काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे. दुसरीकडे पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये मात्र भाजपा व काँग्रेसचे पदाधिकारी हातात हात मिसळून निवडणुकीच्या प्रचारात उतरल्याने सर्वांच्या भूवया उंचाविल्या आहेत. पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकूण १२ हजारांच्या वर मतदार आहेत. तिनही प्रमुख उमेदवारांनी प्रचाराला गती दिल्याने निवडणुक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापविले असल्याचे दिसून येते. सुरूवातीला प्रमुख चार पक्ष व शिवसंग्राम एकत्र आल्याने ही निवडणूक सरळ-सरळ होईल, असे वाटत होते. मात्र, इतर दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही पोटनिवडणूक होत असली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागून आहे. तिनही उमेदवारांचा तोडीस तोड प्रचार असल्याने निवडणुकीत बाजी कोण मारेल, याचे चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.  

टॅग्स :washimवाशिम