शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:53 IST

वाशीम : राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ या आदेशावरुन कृषी विभागाने जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यास सुरुवातही केली, पण महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ 

ठळक मुद्देमहिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या ढिम्म कारभाराप्रति नाराजी आहे़

 

वाशीम : बोंडअळीच्या प्रकोपात  जिल्ह्यातील शेतकºयांचे स्वप्न  कुरतडल्या गेले़ त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ या आदेशावरुन कृषी विभागाने जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यास सुरुवातही केली, पण महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ 

परिणामी तत्काळ आर्थिक मदतीची अपेक्षा बाळगणाºया शेतकºयांनी कृषी विभागाच्या सुस्त कारभारावर टिकेची झोड उठवली आहे़ जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर,रिसोड या भागात प्रामुख्याने बोंडअळीने कहर माजविल्याने कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले़  सोबतच बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते़ दरम्यान, या वृत्ताची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी दुसºयाच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना प्रत्यक्ष भेटून बोंडअळीग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती़ त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हिरवी झेंडी दाखवली़ तदोत्तर जिल्हा कृषी विभागाकडून जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याला प्रारंभ झाला़ पंचनाम्यासाठी तालुकानिहाय कृषी  साहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक अशा तीन कर्मचाºयांची चमु तयार करण्यात आली असून ती बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करीत आहे़ परंतु, कुठे समन्वयाचा अभाव, वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक कारणांमुळे सुट्टया, सार्वजनिक सुट्टयांपायी महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रशासनाच्या ढिम्म कारभाराप्रति नाराजी आहे़ याकडे संबधितांनी लक्ष  देवून त्वरित पंचनामे पूर्ण करावे व शेतकºयांना मदत मिळवून देण्याची मागणी शेतकºयांतून केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती