शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 11:00 IST

Oxygen production project : ऑक्सिजन बेडमध्ये वाढ तसेच तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावाधाव करीत लागत आहे. आगामी तीन ते चार महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. हा अंदाज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी सुरू असून, ऑक्सिजन बेडमध्ये वाढ तसेच तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक वाढली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता सरकारी आरोग्यविषयक सुविधादेखील हळूहळू उपलब्ध होत असून, जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. दुसरीकडे खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये मात्र व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच तीन ते चार महिन्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ही शक्यता गृहीत धरून वरिष्ठ यंत्रणेकडूनदेखील आरोग्यविषयक सुविधा व उपाययोजनांचा आढावा घेतला जात असून, अधिकाधिक सुविधा उपलब्ध कशा होतील, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. त्यानुसार वाशिम व कारंजा येथे अनुक्रमे ७५ व ५० ऑक्सिजन खाटा वाढविण्याचे नियोजन आहे. याशिवाय वाशिम येथे दोन आणि कारंजा येथे एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून, आणखी चार ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले. कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याचेदेखील नियोजन सुरू आहे. 

कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याचे नियोजनतिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तालुकास्तरावर तसेच लोकसंख्येने मोठ्या ग्रामपंचायत स्तरावर कोविड केअर सेंटरची संख्या वाढविता येईल का, या दृष्टिकोनातूनदेखील विचारविनिमय सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत वर्षापासून जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन हे परिश्रम घेत असून, यापुढेही तिसरी लाट थोपविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला सर्वाधिक प्राधान्य राहणार आहे.

या तालुक्यांमध्ये होणार ऑक्सिजन निर्मितीतिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तालुकास्तरावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून वाशिम, मंगरूळपीर, रिसोड व मालेगाव येथे प्रत्येकी एक ऑक्सिजन निर्मिती प्लांट प्रस्तावित करण्यात आला आहे. तुर्तास मानोरा तालुक्याचा यामध्ये समावेश नसल्याने मानोरा तालुक्यातही ऑक्सिजन निर्मिती प्लांटबाबत नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस