गजानन दिगंबर देशमुख या भूमिहीन असलेल्या आणि मिळेल ती मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दोन अपत्यांपैकी लहान असलेल्या विश्वजितने आपले प्राथमिक शिक्षण जि. प.च्या कारखेडा येथील शाळेत पूर्ण केले. आई-वडिलांचे अपार कष्ट आणि घरातून शिक्षणासंबंधी लहानपणापासूनच बाळकडू मिळाल्याने विश्वजितने नवोदय विद्यालयांमध्ये ६ वी ते १२ वी पर्यंत वाशीम येथे प्रवेश मिळवून मिळालेल्या संधीचे स्वतःला सिद्ध करून सोने केले. आर्थिकदृष्ट्या अतिशय बिकट परिस्थिती असल्याने राज्य शासनाकडून राज्य पातळीवर सुपर थर्टीमध्ये निवड होऊन मुंबई येथे एक वर्षाचे प्रशिक्षणही विश्वजितला प्राप्त झाले.
आय. आय. टी. रायपूर येथे चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला असलेल्या विश्वजित सोळंकेला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को (न्यूयाॅर्क) मधील सुप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी डिलाइटमध्ये डाटा एनालिसिस म्हणून काम करण्याची नोकरी मिळाली आहे. घरातील बेताच्या आर्थिक परिस्थितीवर प्रखर जिद्दीच्या बळाने मात करणाऱ्या विश्वजित सोळंकेचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा सत्कार कारखेड्याचे माजी सरपंच भानुदास जाधव, ग्रा.पं. सदस्य दिलीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुरेश परांडे आणि इतर मान्यवरांनी केला.