शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई मिटविण्यासाठी आजीबाईने हाती घेतले कुदळ, फावडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 14:33 IST

मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील चकवा हे गाव पाणीदार व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून येथील राजकन्या मनवर या ६५ वर्षीय वयोवृद्ध आजीबाईने हातात कुदळ, फावडे घेऊन गावशिवारात शेततळ्याचे काम सुरू केले आहे. इ

नाना देवळे लोकमत न्युज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील चकवा हे गाव पाणीदार व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून येथील राजकन्या मनवर या ६५ वर्षीय वयोवृद्ध आजीबाईने हातात कुदळ, फावडे घेऊन गावशिवारात शेततळ्याचे काम सुरू केले आहे. इतरांसाठी ही प्रेरणादायी बाब असून, राजकन्या मनवर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. दुष्काळाची झळ सोसणाºया राज्यातील गावात पाणी फाऊंडेशनच्यावतीने वॉटर कप  स्पर्धा राबविली जात आहे. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील चकवा या गावाने सहभाग नोंदविला असून, येथील जलसाक्षरता अभियान जलदुत रवींद्र इंगोले यांनी एक प्रेरणादायी सभा घेतली. या सभेनंतर सुरुवातीला श्रमदान करण्यासाठी गावकºयांचा  थोडासा प्रतिसाद मिळाला. मात्र अल्पावधीतच प्रभाव ओसरला. ४१६ लोकसंख्या असलेल्या या चकवा गावाला पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन गावातील राजकन्या मनवर यांनी माझं गाव पाणीदार व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून शेततळे खोलीकरणाचे काम करीत आहेत. यावर्षी उन्हाच्या तिव्रतेची तमा न बाळगता रखरखत्या उन्हात त्या दररोज तीन घंटे कुदळ, फावडे व सोबत पाण्याची छोटीशी घागर घेऊन शेततळ्याचे काम करीत आहेत. ही बाब तरुणाईला लाजविणारी ठरत आहे. अनेकजण स्वत: साठी काम करतात. पण मनवर यांनी स्वत:चे गाव पाणीदार व्हावं यासाठी उन्हातान्हात काम करीत आहेत.  प्रत्येकाने नि:स्वार्थ भावनेने श्रमदान केल्यास  गाव पाणीदार व्हायला फारसा वेळ लागणार नाही, असा आशावाद राजकन्या मनवर यांनी व्यक्त केला.  

 

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाMangrulpirमंगरूळपीर