शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:40 IST

वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यासाठी प्रारंभी १८०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते, नंतर १९०० शेततळ्यांचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.या योजनेंतर्गतचे अनुदान दीड लाख रुपये केल्यास शेतकºयांसाठी ही बाब सोयीची ठरणारी राहिल.

वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.          महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी, तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच उत्पादनावर विपरित परिणाम जाणवतो. शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. यासाठी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी प्रारंभी १८०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. नंतर त्यात वाढ करून १९०० शेततळ्यांचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्याचा भूस्तर समान नसून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवघ्या पाच फुट खोलवरच खडक लागतो. त्यामुळे शेतकºयांना निर्धारित अनुदानात शेततळ्यांचे खोदकाम करणे शक्य होत नाही. शासनाने शेततळ्यासाठी ५० हजार रुपये आर्थिक अनुदानाची मर्यादा घालून दिली असताना अनेक शेतकºयांना या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक खर्च करून शेततळे तयार करावे लागले. या कारणामुळेच अनेक शेतकरी योजनेचा फायदा घेण्यास उत्सूक नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. शेतकºयांना योजनेतंर्गत खोदकामाच्या नंतर अनुदान प्राप्त होते. सुरुवातीलाच पैसा खर्च करावा लागत असल्याने अल्पभूधारक  शेतकºयांची इच्छा असताना आणि जमीन शेततळ्यासाठी योग्य असताना पैशाअभावी अडचणी निर्माण होतात, असे मत देऊळगाव बंडा येथील प्रगतशील शेतकरी सोनुबाबा सरनाईक यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात आतापर्यंत ९३६ शेततळी पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गतचे अनुदान दीड लाख रुपये केल्यास शेतकºयांसाठी ही बाब सोयीची ठरणारी राहिल. शासनाने शेतकºयांची रास्त मागणी विचारात घेऊन या योजनेंतर्गतचे अनुदान दीड लख रुपये करावे, अशी मागणी सोनुबाबा सरनाईक, पंजाबराव अवचार, गजानन अवचार, डॉ. संतोष बाजड यांनी केली.शेततळ्याचे उद्दिष्ट गाठण्याची कसरत !

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती