शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॅरेजेस् परिसरात १९०० पैकी केवळ ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:27 IST

वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता वितरण व्यवस्थेची क्षमता वाढविणे आणि त्या अनुषंगाने अतिभारीत होणाºया उपकेंद्राचा भार कमी करणे याकरीता ९५ कोटी रुपये मंजूर आहेत. यामधून ९ नवीन उपकेंद्रे, १९०० नवीन रोहित्र उभारली जाणार आहेत. आतापर्यंत केवळ तीन उपकेंद्रे आणि ५० विद्युत रोहित्रांची कामे पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणेची ही दिरंगाई शेतकºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदी परिसरातील हजारो शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची जोड म्हणून जलसंपदा विभागाच्यावतीने ११ बॅरेजेस उभारण्यात आले. यासाठी तब्बल ७०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक निधी खर्ची पडला. बॅरेजेसची कामेही विहित मुदतीत पूर्ण न झाल्याने अंदाजपत्रकीय किंमतीत भरमसाठ वाढ झाली. बॅरेजेसची कामे पूर्ण झाल्यानंतर उपसा सिंचनाकरीता विद्युत व्यवस्था उभारण्यासाठी साधारणत: सव्वा वर्षांपूर्वीच ९५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झालेला आहे. यापैकी २५ कोटी रुपये एप्रिल २०१८ या महिन्यात जलसंपदा विभागाकडून महावितरणाला प्राप्तही झालेले आहेत. या निधीतून नवीन ९ उपकेंद्रे, उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त तीन रोहित्र उभारणे, ३३ केव्हीची उच्च दाब वाहिणी १६५ किमी, ११ केव्ही उच्चदाब वाहिणी ३१० किमी, १९०० नवीन रोहित्रे आदी कामे केली जाणार आहेत. मात्र, या कामांची गती पाहता शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे. १९०० विद्युत रोहित्रांपैकी जवळपास १५० रोहित्रांची कामे सुरू असून, ५० कामे पूर्ण झाली आहेत. ९ नवीन उपकेंद्रांपैकी ३ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे सुरू आहेत. विद्युतविषयक कामांची गती संथ असल्याने शेतकºयांना सिंंचन करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. बॅरेजेसमुळे  वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर आणि नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. अवैध पद्धतीने पाणी उपसा झाल्याने व अन्य कारणांमुळे राजगाव, टनका, जयपूर, अडगाव, गणेशपूर, कोकलगाव या बॅरेजमध्ये ठणठणाट आहे. यामुळे उन्हाळी पीक घेण्याचे शेतकºयांचे स्वप्न भंगले आहे तर उर्वरीत बॅरेजेसमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने उन्हाळी पीक घेण्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. 

पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेसच्या परिसरात उपसा सिंचनाकरीता प्रस्तावित विद्युतविषयक कामे केली जात आहेत. आतापर्यंत नवीन तीन उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली तसेच १५० पेक्षा अधिक विद्युत रोहित्रांची कामे अंतिम टप्प्यात असून ५० कामे पूर्णही झाली आहेत.- व्ही.बी. बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण