शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १६ पैकी १२ कोविड केअर सेंटर पडले ओस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 11:29 IST

Covid care centers in Washim १६ पैकी १२ सरकारी कोविड केअर सेंटर ओस पडले असून, अन्य चार सेंटरमध्ये १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात १६ सरकारी कोविड केअर सेंटर आहेत. १२ कोविड केअर सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नाहीचार कोविड केअर सेंटरमध्ये १६ रुग्ण उपचारार्थ भरती आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने आणि बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणाला पसंती देत असल्याने कोविड केअर सेंटर ओस पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १२ सरकारी कोविड केअर सेंटर ओस पडले असून, अन्य चार सेंटरमध्ये १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने सरकारी कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या वाढविण्यात आली,  तसेच खासगी कोविड हॉस्पिटललादेखील परवानगी देण्यात आली. ऑक्टोबरनंतर कोरोनाचा आलेख खाली येत आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत असले तरी बहुतांश रुग्ण हे गृहविलगीकरणाला पसंती देत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व दोन ग्रामीण रुग्णालयासह १६ सरकारी कोविड केअर सेंटर आहेत. यापैकी १२ कोविड केअर सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नाही, ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे. उर्वरित चार कोविड केअर सेंटरमध्ये १६ रुग्ण उपचारार्थ भरती आहेत. जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नसल्याने जिल्हावासीयांना तूर्तास दिलासा मिळत आहे.   

कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांवर सोपविली अन्य जबाबदारीजिल्ह्यातील १२ कोविड केअर सेंटर ओस पडल्याने येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्य जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गावोगावी तपासणी मोहीम राबविणे, संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेणे, सर्वेक्षण व अन्य आरोग्यविषयक कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये सहा रुग्णजिल्ह्यात वाशिम शहरातील तीन आणि रिसोड येथील एक असे चार खासगी कोविड हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली होती. यापैकी वाशिम येथील एक हॉस्पिटल बंद करण्यात आले, तर अन्य दोन रुग्णालयांत सहा रुग्ण दाखल आहेत. रिसोड येथील रुग्णालयातही सध्या एकही रुग्ण नाही.

ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. जिल्ह्यातील १२ कोविड केअर सेंटरमध्ये सध्या एकही भरती नाही. मोठ्या संख्येने कोरोना बेड रिकामे आहेत. तथापि, कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.  - डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या