शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

इंडो-इस्त्रायल तंत्रज्ञानाच्या आधारे फुलविली सेंद्रीय पेरूची बाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:21 IST

Hortyculture News Washim पेरूच्या १७०० झाडांची इंडो-इस्त्रायल तंत्रज्ञान पद्धतीने एक हेक्टरमध्ये लागवड केली.

- शेख अनिस बागवान मेडशी (वाशिम) : येथील युवा शेतकरी अजिंक्य मेडशीकर यांनी इंडो-इस्त्रायल तंत्रज्ञानाचा आधार घेत रसायनमूक्त, विषमूक्त शेतीची कास धरून मानवी आरोग्यास पोषक अशी सेंद्रीय फळबाग तयार केली. यात त्यांनी पेरूची १७०० झाडे लावली आहेत. मेडशी येथील अजिंक्य मेडशीकर यांची २०१९ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत निवड झाली. त्यात त्यांनी पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी परभणीतून मराठवाडा कृषी विद्यापीठात विकसीत पेरूच्या १७०० झाडांची इंडो-इस्त्रायल तंत्रज्ञान पद्धतीने एक हेक्टरमध्ये लागवड केली. यासाठी त्यांना कृषी सहाय्यक विलास ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले. जैविक पद्धतीने फळबाग करण्याचा त्यांचा सुरुवातीपासूनच मानस होता. त्यासाठी त्यांनी पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत शेतीचा गट अधिग्रहित केला. पेरूची लागवड करण्यापूर्वी त्यांनी शेतात शेणखत टाकले. फळबागवाढीसाठी तरल खत जैविक पद्धतीने तयार करून फवारण्या केल्या. कंपोस्ट खत तयार करून ते प्रत्येक झाडाच्या मुळाशी दिले. यामुळे जमिनीत जिवाणूची संख्या वाढली. वेळोवेळी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून एस ९ कल्चरची ड्रिचिंग केली. त्यामुळे जमीन भुसभुसीत झाली व मूळा खोल रुजून झाडांच्या जोमदार वाढीसह चांगली फळधारणा झाली. यासाठी जैविक मिशनचे तज्ज्ञ प्रशिक्षक राजेंद्र तायडे यांनी मदत केली.   अजिंक्य मेडशीकर यांच्या फळबागेतील पेरूची झाडे अठरा महिन्यांची असून, त्यांची उंची १० ते १२ फूट आहे. सद्यस्थितीत झाडांना पेरू लागले आहेत. तिसºया वर्षापासून त्यांना यातून १० ते १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षीत आहे. सेंद्रीय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो, तसेच यातीन उत्पादने आरोग्यास पोषक असल्याने अजिंक्य मेडशीकर इतरांनाही सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित करीत आहेत.       अजिंक्य मेडशीकर यांनी एका हेक्टरमध्ये सेंद्रीय पेरूची बाग फुलविली आहे. त्यातून त्यांना वार्षिक १२ लाख उत्पन्न अपेक्षीत आहे.-विलास ढवळे,   कृषी सहाय्यक, मेडशी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी