शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वृक्षलागवडीचा खर्च सामान्य फंडातून करण्याचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 14:24 IST

सामान्य फंडातून एवढा निधी कसा उभारायचा असा प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर निर्माण झाला आहे.

रिसोड : ग्राम पंचायतींना ३२५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून, २२५० रोपट्यांच्या लागवडीचा खर्च हा सामान्य फंडातून करण्याचा फतवा रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी काढला आहे. सामान्य फंडातून २२५० रोपट्यांची लागवड केली तरच नरेगातून १००० रोपट्यांचे हजेरीपत्र काढले जाणार आहे. या प्रकाराला सरपंचांनी विरोध दर्शविला आहे.रिसोड तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतला यावर्षी ३२५० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. दमदार पावसाच्या भरवशावर अनेक ग्राम पंचायत प्रशासन हे वृक्षलागवडीचे नियोजन करीत असताना ७ आॅगस्ट रोजी गटविकास अधिकाºयांनी ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवकांना एक पत्र पाठवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) केवळ १००० वृक्ष लागवड करावी आणि २२५० वृक्षलागवड ही ग्राम पंचायतच्या सामान्य फंडातून करावी, अशा सूचना गटविकास अधिकाºयांनी दिल्या आहेत. सामान्य फंडातून २२५० वृक्षाची लागवड केली तरच १००० वृक्षाचे हजेरीपत्रक काढण्यात येईल अन्यथा काढता येणार नाही, असा इशाराही दिला. ज्या ग्राम पंचायतींनी सामान्य फंडातून खर्चाची तरतूद केली नाही, त्या ग्राम पंचायतच्या हजेरीपत्रकात गैरहजेरी मांडण्याचा धडाका सुरु झाला आहे. या प्रकारामुळे ग्राम पंचायतच्या पदाधिकाºयांमधून रोष व्यक्त होत आहे. १००० वृक्ष लागवडीचे तीन वर्षाचे १२ ते १३ लाख अंदाजपत्रक खर्च आहे. तो ‘मनरेगा’तून होणार आहे तर २२५० वृक्षाची तीन वर्षीय अंदाजपत्रीय खर्च हा जवळपास ३० ते ३२ लाख असणार आहे. एवढा खर्च तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायत करू शकणार नाहीत. लागवड केलेली झाडे दिड वर्षे जीवंत ठेवण्याचे हमीपत्र सरपंच, सचिवांकडून भरून घेण्यात आले आहे.सामान्य फंडातून एवढा निधी कसा उभारायचा असा प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर निर्माण झाला आहे. गटविकास अधिकाºयांच्या त्या पत्रामुळे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत ग्राम पंचायत पदाधिकाºयांमधून साशंकता वर्तविली जात आहे. याबाबत गटविकास अधिकाºयांना विचारणा केली,  ग्राम पंचायतजवळ पैसे नसतील तर मनरेगाअंतर्गतही वृक्षलागवड करू नका, असे त्यांनी स्पष्ट केले.

 आमच्या ग्राम पंचायतची वार्षिक कर वसुली ५० हजाराच्या आत आहे. त्यातुन वृक्षलागवडीवर लाखो रुपये कसे खर्च करावे हा प्रश्न या आदेशामुळे पडला आहे. - शोभाताई विजयराव अवचार उपसरपंच, ग्रा.प. किनखेडा ता. रिसोड

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतRisodरिसोड