शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्हा रुग्णालयात मौखिक तपासणी, नेत्र चिकित्सा कक्षाची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 13:59 IST

 वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र मौखिक तपासणी कक्षाची सुविधा उपलब्ध केली असून, २ डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत या कक्षाचे उद्घाटन झाले.

 वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र मौखिक तपासणी कक्षाची सुविधा उपलब्ध केली असून, २ डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत या कक्षाचे उद्घाटन झाले. तसेच मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत नेत्र चिकित्सा कक्ष सुसज्ज ठेवण्यात आला.कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, वाशिमचे उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती राहुल तुपसांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जे. एम. जांभरुणकर, डॉ. अनिल कावरखे आदी उपस्थित होते.राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मौखिक आरोग्य तपासणी मोहिम १ डिसेंबरपासून हाती घेतली आहे. याअंतर्गत ३० वर्षांवरील व्यक्तींची मौखिक तपासणी व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणा-या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष महिमेचा तसेच मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ २ डिसेंबरला करण्यात आला. यावेळी खासदार गवळी म्हणाल्या की, आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आपल्याला आजार होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्या आरोग्यासाठी काय खावे, काय खाऊ नये? याबाबत प्रत्येकाने दक्ष असावे, असे आवाहन गवळी यांनी केले. आमदार पाटणी म्हणाले, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण युवकांमध्ये अधिक आहे. महाविद्यालयातील विद्यार्थीही  गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना दिसतात. याविषयी पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणा-या दुष्परिणामांची माहिती लोकांना देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी तर संचालन नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. जगदीश बाहेकर यांनी केले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र