शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

नवख्यांना संधी, प्रस्थापितांना नाकारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:41 IST

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ ...

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी ३२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १५ जानेवारी रोजी एकूण ५३९ केंद्रांत दोन लाख ८८ हजार ६९१ पैकी दोन लाख १९ हजार ३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरीय सहा केंद्रांत मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालाने अनेक दिग्गजांना हादरा देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. काही दिग्गजांनी गतवेळच्या पराभवाचा वचपा काढत ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आवश्यक तेवढे सदस्य निवडून आणले.

०००००

सत्तांतर झालेल्या जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायती !

रिसोड तालुका : चिखली, कवठा, व्याड, वनोजा, वाकद, कंकरवाडी, आगरवाडी, गोवर्धन, एकलासपूर, मसला, केशवनगर, गोभणी, पळसखेडा.

मालेगाव तालुका : पांगरी कुटे, डोंगरकिन्ही, जऊळका रेल्वे, उमरदरी, बोराळा, शिरसाळा, वरदरी बु., उमरदरी बु., डही, मुंगळा, कळंबेश्वर, एकांबा, करंजी, खिर्डा.

वाशिम : काटा, अनसिंग, उकळीपेन, टो, अडोळी, वारा, कळंबा महाली, काजळांबा, तोरणाळा, ब्रम्हा, पार्डी टकमोर.

मंगरुळपीर : मानोली, कोठारी, तहाळा, सायखेडा, लावना.

कारंजा : बेंबळा, सोहळ, उंबर्डा, कामरगाव.

मानोरा : धामणी मानोरा, इंझोरी, कोंडोली, वाईगौळ.

०००००००

ईश्वरचिठ्ठीने काटा येथे सत्तांतर

वाशिम तालुक्यातील काटा ग्रामपंचायत ही राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण म्हणून गणली जाते. ११ सदस्य संख्या असलेल्या काटा येथे सत्ताधारी व प्रतिस्पर्धी गटाच्या पॅनलचे प्रत्येकी पाच सदस्य निवडून आले. रुक्मिना मोहन मुखमाले व अनिता चक्रधर कंकणे यांना प्रत्येकी ३४६ मते मिळाल्याने अभिजित अनिल गव्हाणे या मुलाच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये अनिता कंकणे विजयी झाल्या. त्यामुळे सत्ताधारी गटाकडे पाच तर प्रतिस्पर्धी गटाचे सहा सदस्य संख्या असल्याने काटा येथे सत्तांतर अटळ आहे.

बॉक्स

ईश्वरचिठ्ठीने राजुरा येथे सत्तांतर

मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे नऊ सदस्य संख्या असून, सत्ताधारी व प्रतिस्पर्धी गटाला प्रत्येकी चार जागा मिळाल्या. प्रतिस्पर्धी गटाचे मोहन दत्ता कांबळे व सत्ताधारी गटाचे विजय सखाराम इंगळे यांना प्रत्येकी २४० मते मिळाली. ईश्वरचिठ्ठी काढली असता यामध्ये मोहन कांबळे विजयी झाले. त्यामुळे राजुरा येथे सत्तांतर अटळ असून, ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.

००००००००००००००

या दिग्गजांच्या पॅनलचा पराभव

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांच्या पॅनलला चिखली गावात नऊ पैकी तीन जागेवर समाधान मानावे लागले. शिरपूर येथे जि.प. उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, चिवरा येथे आमदार अमित झनक यांचे खंदे समर्थक सुरेश शिंदे, अनसिंग येथे जि.प. सदस्य पांडुरंग ठाकरे, धामणी मानोरा येथे माजी जि.प. सभापती हेमेंद्र ठाकरे, इंझोरी येथे जि.प. सदस्य विनाताई जयस्वाल, वाईगौळ येथे शिवसेना संपर्कप्रमुख भोला राठोड, कुपटा येथे पंचायत समिती माजी उपसभापती अब्दुल बशीर, तळप बु.येथे भाजपचे नेते नीलकंठ पाटील, कोंडोली येथे बाजार समिती माजी सभापती अशोकराव देशमुख यांच्या गटाला पराभवाला सामोरे जावे लागले.

००००००००००००

या दिग्गजांच्या पॅनलचा विजय

मांगूळझनक येथे आमदार अमित झनक यांचे काका पंडितराव झनक यांच्या गटाने नऊ पैकी नऊ जागा पटकावित प्रतिस्पर्धी गटाचा धुव्वा उडविला. चिखली येथे जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक यांच्या पॅनलने नऊ पैकी सहा जागा पटकावत सत्तांतर घडवून आणले. वाकद येथे माजी जि.प. सदस्य रावसाहेब देशमुख व जि.प. सदस्य सुजाता देशमुख, सवड येथे माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन लाटे, कवठा येथे पं.स. सभापती गीता संजय हरिमकर, पळसखेडा येथे पं.स. उपसभापती सुभाष खरात, कंकरवाडी येथे माजी जि.प. सभापती विश्वनाथ सानप, शेलूबाजार येथे सुरेशचंद्र कर्नावट, काटा येथे माजी पं.स. सभापती वीरेंद्र देशमुख, शिरपूर येथे अशोक अंभोरे, मेडशी येथे शेख गणीभाई, वसारी येथे जि.प. सदस्य बेबीताई इंगोले आदींच्या गटाचा विजय झाला.

००००००

मतमोजणी केंद्राजवळ चोख पोलीस बंदोबस्त

कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम, रिसोड, मानोरा, मालेगाव, कारंजा व मंगरुळपीर येथील मतमोजणी केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वृत्त आहे.

०००००

जिल्हाध्यक्ष म्हणतात...

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस समर्थित उमेदवार हे काही ठिकाणी कॉँग्रेस तर काही ठिकाणी महाविकास आघाडी समर्थित उमेदवारांच्या साखळीत रिंगणात होते. निवडणूक निकाल लक्षात घेता राकॉँ समर्थित उमेदवार हे अधिकाधिक जागेवर निवडून आले आहेत.

- चंद्रकांत ठाकरे

जिल्हाध्यक्ष, राकॉं

०००

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना समर्थित पॅनल, आघाड्यांनी चांगली कामगिरी करीत अधिकाधिक जागा निवडून आणल्या आहेत. जिल्ह्यातील जवळपास ६९ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेची सत्ता येईल, असे निवडणूक निकालावरून दिसून येते.

- सुरेश मापारी,

जिल्हाप्रमुख, शिवसेना

००००

ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी समर्थित उमेदवार, पॅनल, आघाड्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातही मतदारांनी भाजप समर्थित उमेदवार, पॅनलला चांगली पसंती दिली आहे.

राजेंद्र पाटणी, आमदार

तथा जिल्हाध्यक्ष भाजप

०००००

ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस समर्थित उमेदवार, पॅनलला मतदारांनी पसंती दिली आहे.अधिकाधिक ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल.

- अ‍ॅड. दिलीप सरनाईक

जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस