शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार"साठी केवळ दोन प्रस्ताव !

By admin | Updated: May 24, 2017 19:30 IST

रिसोड : "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातून २३ मे पर्यंत केवळ दोन प्रस्ताव सादर झाले आहेत.

रिसोड : "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातून २३ मे पर्यंत केवळ दोन प्रस्ताव सादर झाले आहेत. राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ व्हावी या दृष्टीने धरणातील गाळ काढुन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनाने सुरु केली आहे. धरण किंवा तलावातील उपसा करण्यात आलेला गाळ वाहून नेण्यासाठी शेतकरी व अशासकीय संस्थांबरोबरच ग्रामपंचायतींनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. तसेच ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या धरण, तलावातील गाळ उपसा करण्यासाठी लागणारी मशीन व त्याच्या इंधनाचा खर्च संबंधितांना शासनाकडून तसेच सीएसआरमधून दिला जाणार आहे. हा गाळ स्वखर्चाने वाहून नेण्यासाठी तयार असल्याचे अर्ज स्थानिक शेतकरी अथवा अशासकीय संस्था, ग्रामपंचायतींनी तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेकडून करण्यात आले होते. अद्यापपर्यंत केवळ दोन ठिकाणचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, यामध्ये कुऱ्हा व नावली या गावाचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार राजू सुरडकर यांनी दिली.