शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कापूस खरेदीसाठी वाशिम जिल्ह्यात केवळ तीन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:29 IST

Washim News यंत्रणेवर ताण येऊन कापूस खरेदीत गोंधळ उडण्याची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदीची तयारी सीसीआयने केली आहे. दिवाळीनंतर या खरेदीला प्रारंभ होणार आहे. तथापि, जिल्ह्यात फेडरेशनचे एक आणि सीसीआयचे दोन मिळून तीनच केंद्र राहणार आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येऊन कापूस खरेदीत गोंधळ उडण्याची भीती आहे. याचा मोठा त्रास जिल्ह्यातील शेतकºयांना होणार आहे.जिल्ह्यात यंदा २९ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. कपाशीची वेचणी सुरू झाली आहे. शासनाने यंदा लांब धाग्याच्या कपाशीला ५८२५ रुपये प्रती क्विंटल हमीदर घोषीत केले आहेत. जिल्ह्यात मात्र व्यापाºयांकडून अधिकाधिक ५ हजार रुपये प्रती क्विंटल आहेत. अर्थात हमीदरापेक्षा ८०० रुपये कमीदराने शेतकºयांना कपाशी विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतिक्षा करीत आहेत. सीसीआयने कापूस खरेदीची तयारीही केली असून, दिवाळीनंतर या खरेदीला सुरुवात होणार आहे. तथापि, यंदा जिल्ह्यात मंगरुळपीर आणि वाशिम येथे सीसीआय, तर कारंजा येथे फेडरेशन सीसीआयचे उपअभिकर्ता म्हणून हमीभावाने कापूस खरेदी करणार आहे. अर्थात जिल्ह्यात यंदा तीनच शासकीय कापूस खरेदी केंद्र राहणार असल्याने यंत्रणेवर ताण येणार असून, शेतकºयांना त्याचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे.

जिल्ह्यात यंदा तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी होणार आहे. त्यासाठी सीसीआय आणि फेडरेशनने नियोजन केले आहे. या खरेदी प्रक्रियेसाठी बाजार समित्यांत नोंदणी करून घेण्याच्या सूचना आहेत.-सुधीर मेत्रेवार, जिल्हा उपनिबंधक 

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस