...........
वाशिम रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून मोजक्याच रेल्वे सुरू आहेत. यामुळे प्रवाशांची गर्दी राहत नसल्याने वाशिम रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट दिसून येत आहे.
...............
जऊळकात शौचालय वापराकडे दुर्लक्ष
वाशिम : गाव परिसर सदोदित स्वच्छ राहावा, यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनेकांना शौचालय उभारून देण्यात आले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर घाण करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
...............
देयके अदा करण्याचे आवाहन
वाशिम : वाशिम शहरातील नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेली विद्युत देयकाची रक्कम अदा करावी, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता पी.बी. चव्हाण यांनी केले आहे.
...............
महा ऊर्जा अभियानाची जनजागृती
वाशिम : महावितरणने अंमलात आणलेल्या महा ऊर्जा अभियानांतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती सध्या देण्यात येत आहे. या माध्यमातून याअंतर्गत मेडशी येथे गुरुवारी जनजागृती करण्यात आली.
...................
प्रशासनास ‘फायर ऑडिट’चा विसर
वाशिम : शासकीय, खासगी रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घेण्याबाबत मध्यंतरी प्रशासनाने आदेश पारित केले; मात्र कोरोनाच्या धामधुमीत प्रशासनास त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी ठोस कार्यवाही झालेली नाही.
...............
रोहयोच्या कामांना ब्रेक; मजूर हैराण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा, मारसूळ येथे रोहयोच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला. यामुळे कामांना ब्रेक लागला असून खरे जॉबकार्डधारक मजूर रोजगार नसल्याने हैराण झाले आहेत.
.............
५० लाखांवर पाणीपट्टी वसुली
वाशिम : सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी पुरविल्यापोटी येथील जलसंपदा विभागाने ६० लाखांची पाणीपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट बाळगले होते. त्यापैकी सुमारे ५० लाख वसूल झाल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सांगितले.
...........
रुग्णालयात स्वच्छता राखण्याची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बहुतांश ठिकाणी अस्वच्छता पसरत आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून स्वच्छता राखण्याची मागणी अजय शिंदे यांनी बुधवारी केली.
............
कृषी विभागात कर्मचारी अनुशेष
वाशिम : जिल्ह्यातील कृषी विभागात महत्त्वाची ६० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे उरलेल्या ४० टक्के कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त ताण ओढवला असून कामकाज वारंवार प्रभावित होत आहे.
..............
मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत
वाशिम : मध्यंतरी कोरोना संकटातून दिलासा मिळाल्यानंतर लग्नकार्य व इतर कार्यक्रम व्हायला लागले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून मर्यादित उपस्थितीचे बंधन लागू असल्याने संचालक अडचणीत सापडले आहेत.