शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्जासाठी केवळ पाच दिवस शिल्लक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:38 IST

वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीककर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी वंचित शेतकºयांना ३१ मार्च २०१८ पर्यंत म्यान आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्यात २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ या दरम्यान एकूण २ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज नोंदणी केली होती.छानणी व पडताळणीअंती जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार ५३४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. आता ३१ मार्चपर्यंत उपरोक्त शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत.

वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीककर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी वंचित शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१८ पर्यंत म्यान आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असून, कर्जदार शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सोमवारी केले.

जून २०१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकऱ्यां नी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची मर्यादा घालून २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ या दरम्यान कर्जमाफी योजनेची आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली होती. तथापि, या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या विहित कालावधीत अनेक शेतकऱ्यांना काही वैयक्तिक व तांत्रिक कारणांमुळे आॅनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. याची दखल घेत राज्य शासनाने १ ते ३१ मार्च २०१८ अशी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली. यापूर्वी ज्या शेतकऱ्यां नी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीही अर्ज केलेला नाही, अशा अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. वाशिम जिल्ह्यात २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ या दरम्यान एकूण २ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज नोंदणी केली होती. छानणी व पडताळणीअंती जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार ५३४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. जवळपास ९५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीनंतर अर्ज सादर केले नव्हते. आता ३१ मार्चपर्यंत उपरोक्त शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत. २५ मार्चपर्यंत जवळपास ३२ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर केले, असा अंदाज उपनिबंधक कार्यालयाने वर्तविला. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१८ पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कटके यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी