शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहणाचे केवळ आठच प्रस्ताव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:06 IST

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे.

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे,  बोअरवेलची परिस्थिती कशी आहे, हातपंप दुरुस्ती, वीज देयकाचा भरणा न केल्याने बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, किती गावांत टँकरची गरज आहे, आदींसंदर्भात वाशिम जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी केली होती. चाचपणीअंती जिल्ह्यातील एकूण ५१० गावांत पाणीटंचाई गृहित धरून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ४९१ विहिरींचे अधिग्रहण ही उपाययोजना असून, पाणीटंचाईग्रस्त गावात विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई गावांनी विहिर अधिग्रहणासाठी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत आहे. अद्याप केवळ आठ गावांचा अपवाद वगळता कुणीही प्रस्ताव सादर केले नाहीत. त्यामुळे उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. विहिर अधिग्रहण केल्यानंतर संबंधित विहिर किंवा बोअरवेलच्या ठिकाणी ‘अधिग्रहित’ असा फलकही लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी