शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक बाधित वयोगटातील नागरिकच लसीकरणापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:32 IST

Corna Vaccination : १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण २१ जूनपासून सुरू होण्याचे संकेत आहेत.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुसऱ्या लाटेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना अधिक प्रमाणात कोरोना संसर्ग झालेला असताना, नेमके याच वयोगटातील नागरिकांचे लसीकरण गत एका महिन्यापासून थांबले आहे. २१ जूननंतर या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्ववत होण्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभागातर्फे नियोजन केले जात आहे.जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या महिन्यात जनजीवन प्रभावित झाले होते. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला जेमतेम १५ दिवस होत नाहीत, तोच लसींचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून शासनस्तरावरून या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जिल्ह्यात ३२ हजार ९१९ कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १९ हजारांवर रुग्ण हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक बाधित झालेल्या वयोगटातील लसीकरण अद्यापही सुरू झाले नसल्याने युवकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे जवळपास ४५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण २१ जूनपासून सुरू होण्याचे संकेत आहेत.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे जवळपास ४५ टक्के लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण २१ जूननंतर सुरू करण्याचे नियोजन वरिष्ठस्तरावर सुरू असल्याचे समजते. वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व पुढील आदेशानुसार जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल.-  डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस