शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाशिम जिल्ह्यात केवळ ८१ शाळा सुरू; १९४ शाळांसाठी परवानगी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:42 IST

Only 81 schools started in Washim district : स्थानिक प्रशासन व ग्रामस्तरीय समितीची परवानगी मिळावी याकरीता मुख्याध्यापकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संमतीपत्र प्राप्त झालेल्या ८१ शाळा या आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झाल्या असून, अद्याप १९४  शाळांसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाचव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती ३.१९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे प्रत्यक्ष शिक्षणासाठी शाळेचे वर्ग बंदच आहेत. गतवर्षी दोन महिन्यांसाठी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते, परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर वर्ग परत बंद झाले. यंदाही विद्यार्थ्यांसाठी २८ जून रोजी शाळेची घंटा वाजलीच नाही. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने स्थानिक प्रशासन, ग्रामस्तर समिती व पालकांची संमती मिळाल्यानंतर, कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या. जिल्ह्यात ४२०च्या जवळपास ग्रामपंचायती कोरोनामुक्त आहेत. शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन, ग्रामस्तर समितीचा ठराव आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या २७५ शाळा असून, यामध्ये ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे. शिक्षकांची एकूण संख्या २,९०६ आहे. जिल्ह्यात पहिल्या दिवशी अर्थात, १५ जुलै रोजी ७३ शाळा उघडल्या, तर १,८०२ विद्यार्थी उपस्थित होते. पाचव्या दिवशी अर्थात, २० जुलै रोजी ८१ शाळा सुरू झाल्या असून, २,२६१ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. अल्प विद्यार्थी संख्येवरून पालकांच्या मनात अद्याप कोरोनाची धास्ती असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन व ग्रामस्तरीय समितीची परवानगी मिळावी याकरीता मुख्याध्यापकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते.

वाशिम, मानोरा तालुक्यात विद्यार्थी उपस्थिती नगण्य!जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत ७५ हजार ७६० विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील ८,१३३, मालेगाव १२,५४६, मंगरुळपीर ८,२४५, मानोरा ११,३१३, रिसोड १९,०९० आणि वाशिम तालुक्यातील १६,४३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पाचव्या दिवसापर्यंत विद्यार्थी उपस्थिती ३.१९ टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. एकूण २,२६१ विद्यार्थी शाळेत हजर असल्याने, विद्यार्थी उपस्थिती अल्प असल्याचे दिसून येते. सर्वात कमी उपस्थिती वाशिम व मानोरा तालुक्यातील शाळांमध्ये प्रत्येकी १७३ आहे. सर्वात जास्त विद्यार्थी उपस्थिती मालेगाव तालुक्यातील २२ शाळांमध्ये ९४९ आहे.

२९ टक्के शाळा सुरू!जिल्ह्यात ग्रामीण भागात २७५ शाळा असून, आतापर्यंत ८१ शाळा सुरू झाल्या असून, याची टक्केवारी २९.८ अशी येते. उर्वरित शाळांसाठी स्थानिक प्रशासन, ग्रामस्तर समितीचा ठराव अद्याप मिळाला नाही. कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन व ग्रामस्तर समिती ठराव देते. १९४ शाळा सुरू करण्याबाबत ठराव न आल्यामुळे या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. शाळा सुरू करण्यासाठी ठराव केव्हा मिळणार, याकडे शिक्षण विभागासह विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा