मालेगाव : आगामी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या २0 जून रोजी होणार त्यासाठी समस्त शिक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या मतदार संघात निवडणुकीला उभे राहणार्यांची संख्या जवळजवळ डझनभर असली तरीही या मतदानात मतदान करण्यासाठी मालेगाव तालुक्यात केवळ ५७८ शिक्षकांनीच नोंदणी केलेली आहे. विद्यमान आ.वसंतराव खोटरे हे सध्या अमरावती विधान परिषदेच्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहे परंतु यावेळेसची ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत आहेत. यावेळेसच्या निवडणुकीत केवळ ८0 टक्के मतदारांचीच नोंदणी झाली आहे अद्यापही २0 टक्के शिक्षकांनी नोंदणीच बाकी आहे त्यातही निवडणूक २0 जुनला होणार आहे व विदर्भातील शाळा २६ जुन रोजी उघडणार असून उमेदवारांना शिक्षक मतदार सघापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मालेगाव तालुक्यात केवळ ५७८ शिक्षकांची नोंदणी
By admin | Updated: May 24, 2014 01:18 IST