शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडमधील प्रकल्पांत केवळ २४ टक्के साठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:37 IST

पाणीटंचाई तीव्र: गुराढोरांचा प्रश्न गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ): तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी ...

पाणीटंचाई तीव्र: गुराढोरांचा प्रश्न गंभीरलोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम): तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील १८ प्रकल्पांत मिळून केवळ २४ टक्के उपयुक्त साठा उरला आहे.रिसोड तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस पडल्याने कृषी उत्पादनात प्रचंड घट आली. त्यातच प्रकल्पात पुरेसा जलसंचयही झाला नाही. त्यामुळे शासनाने या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. आता तालुक्यातील १८ प्रकल्पांतील पातळी वाढते तापमान आणि उपशामुळे झपाट्याने घटत चालली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील बॅरेजेस आणि प्रकल्प मिळून १८ प्रकल्पांत केवळ ७.५० दलघमी उपयुक्त पाणीसाठा उरला असून, प्रकल्पातील साठवण क्षमतेच्या तुलनेत हे प्रमाण केवळ २४ टक्के आहे. यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गुराढोरांच्या पाण्याचा प्र्रश्नही गंभीर झाला आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शासनाने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.  ६ प्रकल्पांची पातळी शुन्य, ५ प्रकल्प कोरडेरिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांपैकी ६ प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त साठा उरला आहे. त्यात बोरखेडी, धोडप, गौंढाळा, हराळ, करडा आणि वरुड बॅरेजचा समावेश असून, गणेशपूर, मांडवा, मोरगव्हाण, पाचंबा आणि जवळा हे ५ प्रकल्प कोरडे पडले आहेत.  त्यामुळे या गावांतील भुजलपातळीत मोठी घट येऊन विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडत आहेत, तर गुराढोरांसाठी पाणी मिळेनासे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड