शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
4
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
5
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
6
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
7
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
8
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
9
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
10
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
11
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
12
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
13
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
14
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
15
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
16
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
18
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
19
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

केवळ १२ टक्के ज्येष्ठांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:41 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना लसीकरण मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात अंदाजे १ ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना लसीकरण मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात अंदाजे १ लाख ८० हजार व्यक्ती या ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या असताना, त्यापैकी केवळ २२ हजार अर्थात एकूण ज्येष्ठ नागरिकांपैकी केवळ १२ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. प्रशासनाच्या पडताळणीतूनच हे पुढे आले आहे.

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २३ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १३ हजार ४१० व्यक्तिंना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १७४ व्यक्तिंचा मृत्यू झाला, तर ११ हजार ३२५ व्यक्तिंनी कोरोनावर मात केली तसेच १,९१० व्यक्ती उपचाराखाली आहेत.

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तिंसाठी शासकीय केंद्रात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात १ मार्चपासून २५ मार्चपर्यंत केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजारग्रस्त मिळून २९,२५७ जणांनी लस घेतली आहे. त्यात ६० वर्षे वयावरील नागरिकांची संख्या २२ हजारांच्या जवळपास आहे. प्रत्यक्षात ६० वर्षे वयावरील व्यक्तिंना कोरोना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तिंनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

----------------------------

जिल्हाधिकाऱ्यांची जनतेला साद

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यानंतरच रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यात काही रुग्ण चिंताजनक परिस्थितीत दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह साधा, ताप, खोकला, अशक्तपणा, सर्दी, हगवण, मधुमेह, फुप्फुसांचे आजार, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तिंनी तातडीने कोरोना चाचणी करावी तसेच कोरोनाची लस सुरक्षित असून, ती ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजारग्रस्तांनी घ्यावी, अशी साद जिल्हाधिकाऱ्यांनी घातली आहे.

----------------------

चाचणी, लसीकरण वाढविण्यासाठी सरपंचांना पत्र

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यातच पाच हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातही जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तथापि, ग्रामीण भागातून कोरोना चाचणी करण्यासह लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील सरपंचांना एक पत्र देऊन त्यांच्या गावातील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ६० वर्षे वयाच्या दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामस्तरीय समितीला सक्रिय करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.