शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:00 IST

मार्च ते १९ मे या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात तीन केंद्रावर कापूस खरेदी संथ गतीने सुरू असल्याने मार्च ते १९ मे या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे आणखी ७० टक्क्यांच्यावर कापूस पडून आहे; खरीप हंगाम आणि पावसाळा तोंडावर आल्याने कापूस खरेदीची गती वाढविणे आवश्यक ठरत आहे.जिल्ह्यात कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, वाशिम या चार तालुक्यात बºयापैकी कापूस घेतला जातो. पांढºया सोन्याची बाजारपेठ म्हणून कधीकाळी कारंजाची ओळख होती. आताही जिल्ह्यात सर्वाधिक कापूस पीक हे कारंजा तालुक्यात घेतले जाते. कापूस खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात चार केंद्र आहे. त्यापैकी अनसिंग व मंगरूळपीर येथे सीसीआयकडून तर कारंजा व मानोरा येथे फेडरेशनकडून कापूस खरेदी केंद्र सुरू केले. अनसिंंग येथील कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. मंगरूळपीर येथील केंद्रावर सीसीआयकडून खरेदी सुरू आहे. या केंद्रावर मार्चपूर्वी ७० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. लॉकडाउनमध्ये केवळ सात हजाराच्या आसपास कापूस खरेदी झाली. मानोरा येथील केंद्रावर ५०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदी झाली. कारंजा येथील केंद्रावर अडीच हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. कापूस खरेदीची गती संथ असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. ७० टक्के शेतकºयांकडे कापूस आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकºयांना पैशाची गरज आहे. शेतकºयांच्या हातात पैसा आला, तरच खते, बियाणे व अन्य शेतीविषयक कामे सुरळीत होतील.अनसिंग येथील केंद्राची पाहणीअनसिंगच्या केंद्रावरील प्रेस मशीन दुरूस्त करण्यासंबंधी सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे प्रमुख उमेश तायडे यांनी २० मे रोजी पाहणी केली. मशीन दुरूस्तीचा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.मानोरा येथे केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदीएक शेतकरी, एक टोकन, एक वाहन या प्रशासनाच्या यापूर्वीच्या धोरणामुळे कापूस खरेदीतील अडचणी शेतकº्यांसाठी डोकेदुखी ठरल्या. कापूस खरेदी करण्यासाठी विलंब होत आहे. या केंद्रावर केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याने दिरंगाईच्या धोरणाबाबत शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटला.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस