शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उरला केवळ १० टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:13 IST

वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले.

ठळक मुद्देवाशिम तालुक्यातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात आजरोजी ११.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक. सोनल या मध्यम प्रकल्पात मृत जलसाठा असून २२ लघुप्रकल्पांची पाणीपातळी ७ टक्क्यांपर्यंत खालावली आहे.कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात आजमितीस १६.८८ टक्के पाणीसाठा असून १४ लघुप्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक.

वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. दरम्यान, आगामी दोन ते अडीच महिने पाण्याविना कसे भागणार, या चिंतेने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनाही त्रस्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात आजरोजी ११.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ३१ लघुप्रकल्पांमध्ये ११.०२ टक्के पाणीसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात मृत जलसाठा असून २२ लघुप्रकल्पांची पाणीपातळी ७ टक्क्यांपर्यंत खालावली आहे. कारंजा तालुक्यातील अडाण या मध्यम प्रकल्पात आजमितीस १६.८८ टक्के पाणीसाठा असून १४ लघुप्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. याशिवाय मंगरूळपिरातील १५ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १.३० टक्के पाणीसाठा आहे. रिसोड तालुक्यातील २३ प्रकल्पांची पाणीपातळी १४.३१ टक्क्यांवर स्थिरावली असून मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये सद्या ८.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रकल्पांच्या पाणीपातळीत चिंताजनक घट होण्यासोबतच जिल्ह्यातील हातपंप, कुपनलिका, विहिरी यासह इतर जलस्त्रोतही दिवसागणिक कोरडे पडत चालल्याने शेकडो गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सक्रीय पुढाकार घेणे अपेक्षित असल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरण