शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

वाशिम जिल्ह्यात ‘आॅनलाईन’ सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार मिळणे झाले कठीण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 17:19 IST

‘वेबसाईट’ हाताळताना तलाठ्यांना विविध स्वरूपातील समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून महसूल विभागातील बहुतांश कामे प्रभावित झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणात ‘आॅनलाईन’ फेरफार घेण्यासह सात-बारा, आठ ‘अ’ हे महत्वाचे दस्तावेज ज्या ‘वेबसाईट’वरून दिल्या जायचे, त्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून नवी ‘वेबसाईट’ सुरू करण्यात आली आहे; परंतु पुरेसे ज्ञान नसल्याने ही ‘वेबसाईट’ हाताळताना तलाठ्यांना विविध स्वरूपातील समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून महसूल विभागातील बहुतांश कामे प्रभावित झाली आहेत.पुर्वी हस्तलिखीत स्वरूपात दिला जाणारा फेरफार आता ‘आॅनलाईन’ पद्धतीने दिला जात आहे. याशिवाय सात-बारा, आठ ‘अ’ हे महत्वाचे दस्तावेज देखील संबंधित अधिकाºयांच्या डिजिटल स्वाक्षरीने ‘आॅनलाईन’ देण्यात येत आहेत. त्यासाठी ठराविक ‘वेबसाईट’ कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. मात्र, यात पुन्हा एकवेळ मोठा बदल करित पुर्वीच्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून नवी ‘वेबसाईट’ सुरू करण्यात आली. त्यावर काम करित असताना पुरेसे ज्ञान नसल्यामुळे सर्वच प्रकारची कामे प्रभावित होत असल्याने तलाठ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांसह तलाठ्यांकडेही शेतकºयांची शेकडो कामे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिम