शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गरजुंना तातडीने मोफत रक्तदान देणारा आॅनलाईन ‘मोरया ब्लड डोनर गृप’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:34 IST

वाशिम : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजून शहरातील काही युवकांनी ‘आॅनलाईन ब्लड डोनर गृप’ व्दारे शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. गत दोन वर्षांपासून सतत सुरु असलेल्या या गृपच्या माध्यमातून गरजुंना मोफत रक्त मिळत असल्याने या गृपचे विविध स्तरातून कौतूक केल्या जात आहे. 

ठळक मुद्दे वाशिम येथील  महेश धोंगडे व नारायण व्यास यांनी गत दोन वर्षापूवी  याग्रुपची सुरुवात केली. दिवसेंदिवस फेसबुक, वॉटसअ‍ॅपव्दारे या ग्रुपची मोठया प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली आणि गरजू लोकाना याचा लाभ मिळवून देण्यात आला.  या ग्रुपव्दारे आतापर्यंत  १५० गरजू लोकांना रक्त पुरविण्यात आले. 

- नंदकिशोर नारे 

वाशिम : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजून शहरातील काही युवकांनी ‘आॅनलाईन ब्लड डोनर गृप’ व्दारे शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. गत दोन वर्षांपासून सतत सुरु असलेल्या या गृपच्या माध्यमातून गरजुंना मोफत रक्त मिळत असल्याने या गृपचे विविध स्तरातून कौतूक केल्या जात आहे. वाशिम शहरामध्ये दररोज अनेकांना रक्ताची गरज भासते. अशावेळी  स्थानिक रुग्णालयामध्ये रक्ताची कमतरता, गरजुंच्या नातेवाईकांची धावपळ पाहता काही युवकांनी पुढे येवून हा गृप तयार केला आहे.  तसेच आजही अनेकांमध्ये रक्त देण्यासाठी मागे-पुढे पाहिले जाते. अनेकांमध्ये याबाबत गैरसमज दिसून येतात. या गृपव्दारे रक्तदान करणे आरोग्यासाठी किती हितकारक आहे याबाबत मार्गदर्शनही केल्या जाते. वाशिम येथील  महेश धोंगडे व नारायण व्यास यांनी गत दोन वर्षापूवी  याग्रुपची सुरुवात करुन सतत गोर गरीब व गरजू लोकाना विनामुल्य रक्तदान रक्तदात्याच्या मार्फत केल्या जात आहे. सुरुवातीला या ग्रुपमध्ये जवळपास पाच ते दहा लोकांचा समोवश होता . दिवसेंदिवस फेसबुक, वॉटसअ‍ॅपव्दारे या ग्रुपची मोठया प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली आणि गरजू लोकाना याचा लाभ मिळवून देण्यात आला.  या ग्रुपव्दारे आतापर्यंत  १५० गरजू लोकांना रक्त पुरविण्यात आले. हा ग्रुप सध्या आॅनलाईन माध्यमातून चालू आहे . कुठल्याही रुग्णाला २४ तास कधीही रक्ताची आवश्यकता असल्यास वॉटसअ‍ॅप ग्रुपला एक एसएमएस करून किेंवा एक फोन केल्यास संबधिताला विनामुल्य रक्तदान करणारा व्यक्ती उपलब्ध करुन दिल्या जातो.  आगळा-वेगळा रक्तदान दिवस केला साजरा या ग्रुपचा माध्यमातून जागतिक रक्तदान दिवसानिमित्त ग्रुपचे संस्थापक महेश धोंगडे व ग्रुपचे सक्रीय कार्यकर्ता अक्षय हजारे यांनी आवश्यक अपघाती रुग्णाला रक्तदान करून जागतिक रक्तदान दिवस साजरा केला. जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये फळे तसेच बिस्कुट वाटपही केले.  यावेळी महेश धोगंडे , नारायण व्यास, अक्षय हजारो, आनंद भावसार, विक्री गायकवाड, गजानन धोगंडे, लोनसुने, रवि धोगंडे, अजय कलवार, किसन इंगोले, किशोर धोगंडे, प्रदिप देवकर, अमोल खडसे, अजय नंदपुरे, गणेश धोगंडे, वसंता शिंदे, अक्षय धोगंडे, अनिल दाण,े चेतन तिवारे, दत्ता मोहळे, विशाल वानखेडे, अनिल राठी, गजानन सुर्वे  या गृपमधील सदस्यांची उपस्थिती होती.

कुठल्याही प्रकारे रक्त न मिळाल्याने कोणाचाही जीव जावू नये. यासाठी या गृपची स्थापना करण्यात आली असून हा गृप ईतरांनाही माहित असावा यासाठी व रक्तदानाचे महत्व सांगण्यासाठी गृपव्दारे जनजागृती केल्या जात आहे. आॅनलाईनच्या माध्यमातून अनेक जण याच्याशी जुळतांना दिसून येत आहेत.-महेश धोंगडे, वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य