शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाईन क्लासेस’मुळे विद्यार्थ्यांना ‘डोकेदुखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 11:34 IST

डोळ्यावर परिणाम होण्याबरोबरच डोकेदुखीचा (मायग्रेन) त्रासही जाणवत असल्याचे समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकाचा वापर वाढल्याने डोळ्यावर परिणाम होण्याबरोबरच डोकेदुखीचा (मायग्रेन) त्रासही जाणवत असल्याचे समोर येत आहे.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे राज्यात १६ मार्चपासून शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे वर्ग नेमके केव्हा सुरू होणार हे अद्याप निश्चित नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. आॅनलाईन शिक्षणामुळे स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढला आहे. त्याचे विद्यार्थ्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत आहे. तासनतास टॅब, मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर बसल्याने विद्यार्थ्यांना डोळेदुखी तसेच डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे पालक अमर रामवाणी, शंकर केसवाणी, मिलिंद अरगडे, अमोल उमाळे, दशरथ पवार आदींनी सांगितले.

मोबाईल, संगणकावर सतत आॅनलाईन राहिल्यामुळे डोळे, मेंदुवर ताण पडतो. त्यामुळे साहजिकच डोकेदुखीचा त्रास जाणवतो. चिडचिडही वाढू शकतो. मेंदूवर जास्त ताण आल्यास अभ्यासात मन लागत नाही.- डॉ.नरेश इंंगळे,मेंदु व मानसोपचार तज्ज्ञ वाशिम

मोबाईल, संगणकावर अभ्यास करताना जास्त वेळ आॅनलाईन ‘स्क्रिन टाईम’ असेल तर डोळ्याला त्रास जाणवू लागतो. डोळ्यावर ताण येत असल्याने डोकेदुखी त्रासही जाणवतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची दक्षता घ्यावी. - डॉ. स्वीटी गोटे,नेत्ररोग तज्ज्ञ, वाशिम

आॅनलाईन शिक्षणामुळे मुलांना जास्त प्रमाणात मोबाईल, संगणक, टॅबचा वापर करावा लागतो. यामुळे मुलांना डोळेदुखी तसेच डोकेदुखीचा त्रास्त जाणवतो. मानदुखीचा त्रासही मुलांना जाणवत आहे.- विनोद बसंतवाणीपालक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइन