इसमास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:50+5:302021-01-08T06:12:50+5:30

आसेगाव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत येणाऱ्या कळंबा बोडखे येथे इसमास शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी ७ जानेवारी ...

One of them was found guilty of assault | इसमास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

इसमास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

Next

आसेगाव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत येणाऱ्या कळंबा बोडखे येथे इसमास शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी ७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कळंबा बोडखे येथील फिर्यादी परमचंद मेराम चव्हाण (५२) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादी ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शिवारात शेळ्या चारण्यास घेऊन जात असतान आरोपी राम शिवचंद राठोड रा. कळंबा बोडखे याने फिर्यादीस आमच्या शेतातील मोटारपंपाच्या इंजिनमध्ये माती का टाकली, असे म्हणत अश्लील शिवीगाळ करून पाठीवर कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यात फिर्यादीला गंभीर दुखापत झाली. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राम शिवचंद राठोड याच्यावर कलम ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. दरम्यान, आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गत गुन्ह्यांचे प्रकार नव्या वर्षातही वाढत असल्याचे दिसून येत असून, गत आठवडाभरात ५ गुन्ह्यांची नोंद येथे झाली आहे.

Web Title: One of them was found guilty of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.