शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

ट्रक, एसटी, दुचाकीच्या अपघातात एक ठार; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:47 IST

राहुल खुलाराम डवले (२८), असे मृतकाचे नाव असून, नथ्थूराम बोरकर (२५) आणि अंबादारस आनंदराव घुले (६०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव: समोरून येणारी एसटी बस आणि मागून येत असलेल्या ट्रकच्यामध्ये दुचाकी आल्याने घडलेल्या अपघातात एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कारंजा तालुक्यातील कामरगाव ते विळेगावदरम्यान १४ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. राहुल खुलाराम डवले (२८), असे मृतकाचे नाव असून, नथ्थूराम बोरकर (२५) आणि अंबादारस आनंदराव घुले (६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले.विळेगाव येथील राहुल डवले हा नथ्थूराम बोरकर आणि अंबादास घुले यांच्यासह कामरगाव येथे उपचार करून विळेगावकडे परत जात असताना विळेगाव ते कामरगावदरम्यान समोरून येत असलेली एसटी बस आणि मागून येत असलेल्या ट्रकच्यामध्ये ही दुचाकी गेल्याने अपघात घडून राहुल डवले हा घटनास्थळीच ठार झाला, तर नथ्थूराम बोरकर आणि अंबादास घुले हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करून अमरावती येथे हलविण्यात आले. या प्रकरणी मृतकाचा भाऊ रामेश्वर डवले याने कामरगाव पोलिसांत तक्रार नोंदविली असून, धनज बु. ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस करीत आहेतदरम्यान, कामरगाव ते विळेगाव दरम्यान रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून, या मार्गावर वाहनचालकांसाठी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे मत उपस्थित ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत होते. आहेत.(वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात