शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:12 IST

अंकूश भिमराव राठोड (३०), असे मृतकाचे नाव असून, रवि भिका राठोड (३३) असे गंभीर जखमीचे नाव आहे. 

लोकमत न्युज नेटवर्क आसेगाव (वाशिम): पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत येणाºया शेंदुरजना आढाव रूई मार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना १४ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. अंकूश भिमराव राठोड (३०), असे मृतकाचे नाव असून, रवि भिका राठोड (३३) असे गंभीर जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी लहू भिमराव राठोड (३३, रा. पाळोदी, ता. मानोरा) याने फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादीचा भाऊ अंकूश भिमराव राठोड हा १४ जून रोजी रात्री रवि भिका राठोड याच्या मालकीच्या एमएच-२९, एएक्स ३४९२ क्रमांकाच्या दुचाकीने रुई येथून शेंदुरजना आढाव येथे जात होते. या दरम्यान लाल रंगाच्या एका ट्रॅक्टरचालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. त्यामुळे अपघात घडून अंकूश राठोड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रवि राठोड गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी एमएच-३७, एफ २३३० क्रमांकाचा ट्रॅक्टर तपासकामी ताब्यात घेतला असून, ट्रॅक्टरचालकावरकलम ३०४ (अ), ३७९, ३३७ सहकलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात