वाशिम : वाशिम ते हिंगोली मार्गावरील राजगाव गावानजीक मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमध्ये एक युवक ठार तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना १६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मालेगाव तालुक्यातील अनिल अहिरे व आदित्य राजू कुटे हे दोघे मोटरसायकलने राजगाव (ता.जि. वाशिम) येथून वाशिमकडे येत होते. सायखेडा फाट्यानजीक एका अज्ञात वाहनचालकाने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकल झाडावर जाऊन आदळली. या अपघातात अनिल अहिरे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राजू कुटे याला गंभीर दुखापत झाली. रात्री उशिरापर्यंंंंत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, अलिकडच्या काळात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
दुचाकी अपघातात एक ठार
By admin | Updated: March 17, 2016 02:25 IST