शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची लपवाछपवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:59 IST

वाशिम जिल्ह्यात एका मृत्यूची माहिती लपविण्यात आल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे बळी गेला. अशातच महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला होता, त्याच्या पृष्टर्थ त्यांनी सरकारचा हवाला देत बुधवारी एक टिष्ट्वट केले. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात एका मृत्यूची माहिती लपविण्यात आल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणविस यांनी केला होता. या आरोपाने राज्याची आरोग्य यंत्रणाचा अडचणीत आली होती. दरम्यान शासनानेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची सुधारीत यादी प्रसिद्ध केल्यावर त्यामध्ये वाढलेला मृतकांचा आकडा हा लपविलेला होता असा दावा करीत फडणवीस यांनी पुन्हा नवी आकडेवारी टिष्ट्वट केल्याने सध्या आकडयांचा खेळ रंगला आहे.जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांच्या मार्गदर्शनानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मृत्यूची समीक्षा करणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला जिल्हा स्तरावर रुग्णाच्या मृत्यूचे आॅडिट सात दिवसांच्या आत करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये रुग्णाच्या मृत्यूच्या कारणांचा सविस्तर शोध घेणे, रुग्णांच्या मृत्यूचे तत्कालिन कारण कोविड-१९ नसल्यास तसे नमूद करणे आवश्यक आहे. अशा रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे गृहित धरण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने फेरतपासणीच्या नावाखाली आकड्यांमध्ये बदल केल्याचा आरोपही त्यांनी या टिष्ट्वटच्या माध्यमातून केला. सरकारचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये वाशिम जिल्ह्यातील १ मृत्यू लपविण्यात आल्याचे सांगितले आहे. या माहितीमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे दोन मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये मुंबई येथून नागपूरकडे जाणाºया ट्रकचा क्लिनर तसेच मुंबई येथून मालेगावला परतत असताना कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील मालेगाव येथील एका इसमाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कवठळ ता. मंगरूळपीर येथील रुग्ण हा वर्धा जिल्ह्यातच कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने आणि त्याचा मृत्यू वर्धा येथेच झाल्याने त्याची नोंद वाशिम येथे करण्यात आली नाही.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या