शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अडाण धरणाच्या पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

By नंदकिशोर नारे | Updated: July 8, 2023 14:34 IST

पोलीस पाटील हरिदास राऊत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

वाशिम : मानोरा तालुक्यातील इंझोरी  येथून जवळच असलेल्या म्हसनी येथील बळीराम दौलत वरघट (६०) यांचा तोरनाळा शिवारातील अडाण धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी उघडकीस आली. पोलीस पाटील हरिदास राऊत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

म्हसणी येथील रहिवासी बळीराम वरघट हे मोलमजूरी करून अडाण धरणात मासे पकडण्याचे काम करित होते. ७ जुलै रोजी अडाण धरणात मासेमारीकरिता गेले; मात्र ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटूंबियांनी धरणावर पाहणी केली. यादरम्यान बळीराम यांचा मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यात पाय अडकून मृत्यू झाल्याचे ८ जुलै रोजी निदर्शनास आले. 

माहिती मिळताच मानोरा पोलिस स्टेशनचे बीट जमादार सुभाष महाजन, रवींद्र राजगुरे, शंकर राख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच बळीराम वरघट यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याकामी इंझोरी ‘सास’चे हेड अजय ढोक यांच्यासह स्वप्निल वरघट, शुभम वरघट, रोशन वरघट व धम्मा अंभोरे यांनी प्रत्यक्ष मदतकार्य केले. मानोरा येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिम