शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलांच्या मदतीसाठी सरसावले अधिकारी, कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 13:03 IST

जोगलदरी (वाशिम) : मातापित्याचे छत्र हरविलेले मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील रामेश्वर, ज्ञानेश्वर या मुलांच्या मदतीला वाशिम शहरातील अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम) : मातापित्याचे छत्र हरविलेले मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील रामेश्वर, ज्ञानेश्वर या मुलांच्या मदतीला वाशिम शहरातील अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत. शनिवारी सांयकाळी त्यांनी मुलांच्या घरी सहा महिन्याच्या धान्यासह २१ हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून दिली, तसेच या मुलांसह त्यांच्या दिव्यांग आजीआजोबांना नवे कपडेही दिले. सावरगाव येथील भुमीहिन शिवराम जाधव (४०) हे रोजमजुरी करून दिव्यांग आईवडिलांसह पत्नी आणि दोन मुलांचा सांभाळ करीत होते. अशातच १५ वर्षांपूर्वी मळणी यंत्रात त्यांना उजवा हात गमवावा लागला. त्यानंतर त्यांनी गुरे राखून कुटुंबाचा सांभाळ करीत असताना त्यांच्या पत्नी अरुणा जाधव यांना दुर्धर आजार जडला. पत्नीवर उपचार करीत कुटुंबाचा गाडा ते ओढत होेते; परंतु आठ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. ते दु:ख उरात दडवून त्यांनी रामेश्वर, ज्ञानेश्वरला सांभाळले; परंतु शनिवार १७ नोव्हेंबर रोजी शिवराम जाधव यांचा मृत्यू झाला. त्यामुळे  रामेश्वर, ज्ञानेश्वर पोरके झाले. या मुलांच्या मदतीसाठी प्रा. किशोर राठोड यांच्या संकल्पनेतून वाशिम येथील सुरेश राठोड कारभारी, अभियंता बी. एस. राठोड, डॉ. संदेश राठोड, डॉ. सुनील राठोड, डॉ. अजय राठोड, डॉ. सचिन पवार, अभियंता सेवाराम चव्हाण, अभियंता पुरुषोत्तम राठोड, अभियंता पी. के. चव्हाण, प्रा. डॉ. विपीन राठोड, प्रा. डॉ. विजय जाधव, प्रा. प्रेमसिंग राठोड, प्रा.व्ही. एम. राठोड, प्रा. विनोद राठोड, प्रा. संतोष राठोड, प्रदीप राठोड, तलाठी यू. पी. राठोड, विनोद चव्हाण, यू,आर. राठोड, किशोर राठोड, वाय. पी. राठोड, कमलसिंग राठोड, कैलास राठोड, संतोष जाधव, कैलास राठोड, कैलास पवार,  संजय जाधव, रविंद्र जाधव, बी. एम. राठोड, सुभाष चव्हाण, आदिंनी जाधव परिवाराला आर्थिक मदत केली, तसेच सहा महिन्यांचे धान्य आणि कपडेही दिले. पुढेही ही मदत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर