शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची कार्यालये भाड्याच्या इमारतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:54 IST

वाशिम : जिल्ह्यातील सहापैकी तीन तालुक्यांमधील तालुका कृषी अधिकारी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. तथापि, तुलनेने कमी प्रमाणातील जागेत कारभार चालविताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून अपेक्षित सोयी-सुविधांचाही अभाव असल्याने यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी पुरते वैतागले आहेत. वाशिम येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती ...

ठळक मुद्देवाशिम येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील भाड्याच्या इमारतीत. मंगरूळपीर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय पूर्वी वाढा फार्म येथे चालायचे.रिसोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचीही अशीच अवस्था असून भाड्याच्या तथा तुलनेने अपुऱ्यां जागेत सर्व कामे उरकावी लागत आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील सहापैकी तीन तालुक्यांमधील तालुका कृषी अधिकारी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. तथापि, तुलनेने कमी प्रमाणातील जागेत कारभार चालविताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून अपेक्षित सोयी-सुविधांचाही अभाव असल्याने यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी पुरते वैतागले आहेत. वाशिम येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील भाड्याच्या इमारतीत असून त्याचठिकाणी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय देखील थाटण्यात आले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय दुध शितकरण केंद्रासमोरील भाड्याच्या इमारतीत सुरू होते. ते गेल्या दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्यात आले. मृद संधारण प्रयोगशाळा जुन्या जिल्हा परिषदेसमोरील एका भाड्याच्या इमारतीत सुरू होणार होती. मात्र, त्यास अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. मंगरूळपीर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय पूर्वी वाढा फार्म येथे चालायचे. शेतकºयांच्या दृष्टीने अत्यंत दूर असलेले हे कार्यालय साधारणत: चार वर्षांपूर्वी शहरातील मध्यवर्ती ठिकाणावर भाड्याच्या इमारतीत हलविण्यात आले. रिसोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचीही अशीच अवस्था असून भाड्याच्या तथा तुलनेने अपुऱ्यां जागेत तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाºयांना सर्व कामे उरकावी लागत आहेत. एकूणच या सर्व समस्यांमुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना विविध स्वरूपातील गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरRisodरिसोड