शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे वैधमापन शास्त्र विभागाचे कार्यालय ‘कुलूपबंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:07 IST

येथे एका भाड्याच्या जुनाट इमारतीत सुरू असलेले कार्यालय अडगळीत सापडले असून ते मंगळवार, ४ डिसेंबर रोजी ‘कुलूपबंद’ असल्याचे आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध स्वरूपातील साहित्य वजनमापांव्दारे विक्री करणाºया सर्व दुकानांमधील वजनकाट्यांची नियमित तपासणी, नुतनीकरण यासह तत्सम बाबींची जबाबदारी असलेल्या निरीक्षक वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार सद्या आलबेल झाला आहे. येथे एका भाड्याच्या जुनाट इमारतीत सुरू असलेले कार्यालय अडगळीत सापडले असून ते मंगळवार, ४ डिसेंबर रोजी ‘कुलूपबंद’ असल्याचे आढळून आले. वजनकाट्यांमध्ये हेराफेरी करून ग्राहकांची आर्थिक लूट करणाºया दोषी दुकानदारांविरूद्ध कारवाई करण्यासाठी वैधमापन शास्त्र विभागाची निर्मिती करण्यात आली. वाहनांमध्ये डिझेल, पेट्रोल कमी टाकले जात असल्यास वेळोवेळी तपासणी करून पेट्रोलपंपांवर कारवाई करणे, हॉटेल्स-रेस्टॉरेंटची तपासणी करून ग्राहकांना पुरविल्या जाणाºया साहित्याची तपासणी करण्यासह तत्सम बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या विभागाला पेलावी लागते. प्रत्यक्षात मात्र वाशिम येथील वैधमापन शास्त्र विभागाच्या कार्यालयाकडून कुठलीच ठोस कार्यवाहीची मोहिम राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे या कार्यालयात सद्य:स्थितीत निरीक्षकासह अन्य दोन कर्मचारीच कार्यरत असून ते आठवड्यातून केवळ एक दिवस अर्थात सोमवारी वाशिमच्या कार्यालयात बसून अन्य दिवशी कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शिबिर घेण्याकरिता जात असल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र, कुलूपबंद असलेल्या वाशिमच्या कार्यालयात शिरपूर येथे शिबिर कार्यालय सुरू असल्याची नोट पाहून प्रत्यक्ष चौकशी केली असता, शिरपूरमध्ये कुठेही शिबिर सुरू नसल्याचा गंभीर प्रकार आढळून आला. एकूणच या सर्व बाबींवरून वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार सर्वच पातळ्यांवर ढेपाळल्याचे दिसून येत आहे.कार्यालयीन इमारतीची वीजबत्ती गुल!वैधमापन शास्त्र विभागाच्या वाशिम येथील भाड्याच्या कार्यालयाची सद्य:स्थितीत प्रचंड दुरवस्था झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या इमारतीचा वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे. यासह अन्य स्वरूपातील विविध समस्या उभ्या झाल्या असून त्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वैधमापन शास्त्र विभागात केवळ तीन कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यांनाच सर्व कामांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. अशाही स्थितीत कामांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे.- बी.बी. गायकवाडनिरीक्षक, वैधमापन शास्त्र विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिम