शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर परिसरातील शाळांत पोषण आहार सुरळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 14:38 IST

लोकमतने ‘शिरपूर परिसरातील शाळा पोषण आहाराविना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन प्रशासनाने शाळांत पोषण आहारासाठी तांदूळ, तसेच इतर साहित्य उपलब्ध केले.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैनसह परिसरातील शाळांत पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने मागील १५ दिवसांपासून शाळांतील पोषण आहार बंद होता. या संदर्भात लोकमतने ‘शिरपूर परिसरातील शाळा पोषण आहाराविना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन प्रशासनाने शाळांत पोषण आहारासाठी तांदूळ, तसेच इतर साहित्य उपलब्ध केले. त्यामुळे शाळांतील पोषण आहार वितरण पुन्हा सुरू झाले.शिरपूर परिसरातील शाळांना पोषण आहार पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने शालेय विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित राहत असल्याचे चित्र शिरपूर व परिसरातील शाळांमध्ये दिसून येत होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन मध्यान्ह भोजनाकरिता पोषण आहार पुरवित असते. मात्र, मागील १५ दिवसांपासून शिरपूर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये खिचडी शिजलीच नाही. प्रत्यक्षात पोषण आहारातील खिचडी शिजविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ आणि इतर साहित्य शाळांत उपलब्ध नव्हते. त्यामुळे शिक्षकवर्गही अडचणी सापडले आणि शाळांतील पोषण आहार वितरण ठप्प झाले. दोन महिन्यांपूर्वीही शिरपूर परिसरात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी देखील बरेच दिवस शालेय विद्यार्थी दुपारच्या पोषण आहारापासून वंचित राहिले होते. पुन्हा हा प्रकार गत १५ दिवसांपासून सुरू झाला आहे. त्यातच दर शुक्रवारी राबविण्यात येणाºया बिस्किट वाटपाचा कार्यक्रमही बारगळल्याने बिस्कीट मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते. लोकमतने या संदर्भात ‘शिरपूर परिसरातील शाळा पोषण आहाराविना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधले. त्याची तात्काळ दखल घेऊन शिरपूर परिसरातील शाळांत पोषण आहारासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी या शाळांत पुन्हा पोषण आहारातील खिचडी शिजू लागली असून, शाळेतील चिमुकल्यांना त्याचा आधार झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन