शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

कोरोना लस घेण्यात नर्स सर्वात पुढे; डाॅक्टर मागे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:55 IST

Corona Vaccine News लस घेण्यात नर्स व सुपरवायझर सर्वात पुढे असून, डाॅक्टर्स सर्वात मागे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, आतापर्यंत ५३२४ पैकी ३६४५ फ्रंटलाइन वर्कर्स यांनी लस घेतली आहे. लस घेण्यात नर्स व सुपरवायझर सर्वात पुढे असून, डाॅक्टर्स सर्वात मागे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात अजूनही काही जण उत्सुक नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पहिल्या टप्प्यात ५३२४ फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. आतापर्यंत ३६४५ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये नर्स आणि सुपरवायझर तसेच पॅरामेडिकल स्टाफ यांची टक्केवारी ९१ तर डाॅक्टरांची टक्केवारी ८४ आहे. फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यानंतर महसूल व पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. कोरोना लसीकरण टाळण्यासाठी दिलेल्या कारणांची मोठी यादी

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, अधिकाधिक फ्रंटलाइन वर्कर्स यांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने वारंवार केले. मात्र, विहित मुदतीत कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.लस घेण्यासंदर्भात संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होतो. मात्र, सध्या बाहेरगावी आहे, तब्येत ठीक नाही, नंतर लस घेतो असे म्हणत अनेक जण लस घेण्याला सोयीस्कररीत्या बगल देत असल्याचे समोर येत आहे.अन्य जिल्ह्यात काही जणांना कोरोना लसीकरणानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी साैम्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे अजूनही काही फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या मनात कोरोना लसीकरणाविषयी धाकधूक असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस