शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Nurse Day Special : घर सांभाळून ‘त्या’ करताहेत रुग्णांची सुश्रूषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 11:31 IST

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कर्तव्य बजावणाºया ४० ते ५० परिचारिकांचा घर ते रुग्णालय या दरम्यानचा प्रवास थक्क करणारा आहे.

- संतोष वानखडे

वाशिम : ‘रुग्णसेवा हेच खरे व्रत’ असे मानून आपले संपूर्ण जीवन या कार्यात घालवणाऱ्या परिचारिका कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटसमयीदेखील तेवढ्याच तत्परतेने आपले कर्तव्य बजावून रूग्णांची सुश्रूषा करीत आहेत. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कर्तव्य बजावणाºया ४० ते ५० परिचारिकांचा घर ते रुग्णालय या दरम्यानचा प्रवास थक्क करणारा आहे.एकीकडे कामाचे वाढणारे तास, असुरक्षितता तर दुसरीकडे स्वत:च्या कौटुंबीक जबाबदाºया अशा दुहेरी कसरतीच्या ओझ्याखाली परिचारिका त्यांचे जीवन व्यतित करत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परिचारिकांची जबाबदारी वाढली असून, अशा परिस्थितीत न डगमगता त्या सेवा देत आहेत. ग्रामीण भागातील काही परिचारिकांना आवश्यक ती सुरक्षित साधने उपलब्ध नसतानाही या परिचारिका घर सांभाळून रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात सेवा देणाºया परिचारिकांना घरी परतताना, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी म्हणून स्वत: होम क्वारंटीनही व्हावे लागते. इतर कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ असले तरी आमच्यासाठी मात्र ‘ड्यूटी फॉर पेशन्टस्’ असून, रुग्णसेवेतून आत्मिक समाधान मिळत असल्याचे परिचारिका अभिमानाने सांगतात.

रुग्णसेवेत परिचारिकाजिल्हा रुग्णालयातील मेट्रन हंसा कांबळे, सखू हजारे यांच्यासह ६६ परिचारिका सेवा देत आहेत. यापैकी विलगीकरण कक्षात ४० ते ४५ परिचारिका सेवा देत आहेत. विलगीकरण कक्षातील परिचारिकांना कुटुंबासह संदिग्ध रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. यामध्ये चांगलीच कसरत होत आहे.

रुग्णसेवेचे व्रत हाती घेतले असून, त्याअनुषंगाने कर्तव्याबरोबरच सामाजिक भान म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न आहे. घर ते रुग्णालय या दरम्यानच्या जबाबदाºया पार पाडताना थोडीफार कसरत तर होतेच; परंतू, रूग्ण बरा झाल्यानंतर त्यांच्या चेहºयावर फुललेले हास्य पाहून रुग्णसेवेचे चिज झाल्याचे समाधानही मिळते. - पुनम खंडारे,परिचारिकाजिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्य पार पाडताना विविध आजाराच्या रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळते. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटसमयी तर खरी कसोटी आहे. अशा परिस्थितीतही कोणतीही तमा न बाळगता सर्व परिचारिका आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. रुग्ण हीच खºया अर्थाने ईश्वरसेवा आहे.-राखी काळे, परिचारिका

 

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल