कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कारंजा शहर व परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. पुढील अनेक दिवस हे चित्र कायम राहिले. आता मात्र रुग्णसंख्या हळूहळू कमी होत चालली असून संकट ओसरत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
.................
कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना संसर्गाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कुठलीच बेफिकिरी न बाळगता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.
.................
पाणीप्रश्न निकाली काढण्याची ग्वाही
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असून हा प्रश्न विनाविलंब निकाली काढू, अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी दिली.
..................
प्रवासी निवाऱ्यांमुळे ग्रामस्थांची सोय
वाशिम : वाशिम ते शेलुबाजार हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर विविध ठिकाणी प्रवासी निवारे उभारण्यात आले असून यामुळे आसपासच्या गावातील ग्रामस्थांची सोय झाली आहे.
..............
घरकूल कामांना वेग देण्याची मागणी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट तीव्र होण्यासोबतच रेतीही मिळत नसल्याने घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. हा प्रश्न निकाली काढून घरकूल कामांना वेग देण्याची मागणी होत आहे.
.................
पूल नादुरुस्त; अडचण जाणवणार
वाशिम : कारंजा तालुक्यातील हिंगणवाडी ते रामटेक या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम रखडले असून पुलाची दुरुस्तीही प्रलंबित आहे. यामुळे पावसाळ्यात विशेष अडचण जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.
................
बँकांमध्ये गर्दी; नियमांचे उल्लंघन
वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
कोरोनाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी करू नये, कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळण्यासह तोंडाला मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे; मात्र अनेकांकडून त्याचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.