शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा ५८४ पार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 11:16 IST

कोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान गुरूवारी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवार, ३० जुलै रोजी स्पष्ट झाले. आता एकूण रुग्णसंख्या ५८४ झाली आहे. दरम्यान, अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान गुरूवारी मृत्यू झाला.कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा दर चढता असून, यामध्ये १९ जणांची भर पडली. बुधवारी दुपारी १२ वाजता प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात आणखी ११ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यामध्ये मानोरा शहरातील रहिमानिया कॉलनी परिसरातील २, तहसील कार्यालयानजीकच्या परिसरातील १, विळेगाव (ता. मानोरा) येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथील ३, वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १ आणि कळंबा महाली येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.सायंकाळी ७.३० वाजता प्राप्त अहवालानुसार आणखी ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले. यामध्ये मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील १, इराळा येथील ३ व कारंजा लाड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १ व मंगरूळपीर शहरातील टेकडीपुरा परिसरातील १ व लाठी (ता. मंगरूळपीर) येथील २ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५८४ झाली आहे. यापैकी २०८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (सक्रिय) आहेत. गुरूवारी १६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला परिसर सील केला असून, आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली.

१६ जणांना डिस्चार्जजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १६ व्यक्तींना गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये रिसोड तालुक्यातील १०, वाशिम शहरातील ध्रुव चौक येथील १ व साईलीला नगर येथील १, मंगरूळपीर शहरातील बढाईपुरा परिसरातील २ व आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ आणि कारंजा लाड शहरातील नगरपालिका परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.

एका रुग्णाचा अकोल्यात मृत्यूजिल्ह्यात मृत्यूच्या संख्येतही हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येते. अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील एका रुग्णाचा गुरूवार, ३० जुलै रोजी मृत्यू झाला. मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम