शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता घरुनच काढा रेल्वे प्रवासाचे जनरल तिकीट, रांगेपासून होणार सुटका; रेल्वेनं सुरू केली खास सुविधा

By दिनेश पठाडे | Updated: December 12, 2022 18:30 IST

प्रवाशांची रांगेतून सुटका व्हावी, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने ॲप विकसित केले आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांनी जनरल तिकीट घर बसल्या काढता येणार आहे.

वाशिम : अनारक्षित तिकीट मिळवण्यासाठी रेल्वेप्रवाशांना तासन तास तिकीट खिडकीसमोर रांगेत उभे राहावे लागते. स्टेशनवर पोहचण्यास विलंब झाला तर अनेकांवर तिकीट न काढताच प्रवास करण्याची वेळ येते. त्यामुळे विना तिकीट प्रवासाचा दंड त्यांना भरावा लागतो. यासर्व समस्येतून प्रवाशांची आता सुटका होणार असून घरुनच रेल्वेप्रवासाचे जनरल तिकीट काढता येणार आहे.

मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने आरक्षित तिकीट काढण्याची सुविधा प्रवाशांना मिळत आहे. मात्र, ऐनवेळी प्रवासाचा बेत आखल्यानंतर अनारक्षित डब्यांतून प्रवास करावा लागतो. त्यासाठी प्रवासाचे योग्य तिकीट काढण्यासाठी रेल्वेस्थानकावर एक तास अगोदर पाेहचून प्रवासी रांगेत उभे राहून तिकीट मिळवतात. तासन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. यातून आता प्रवाशांची सुटका होणार असून घर बसल्याच तिकीट काढण्याची सुविधा रेल्वे विभागाने मोबाइलच्या माध्यमातून सुरु केली आहे. 

बदलत्या काळानुरुप रेल्वे हायटेक होत आहे. त्यात आता आणखी भर पडली असून जनरल तिकीट देखील ऑनलाइन पद्धतीने काढता येणार असल्याने हा निर्णय प्रवाशांसाठी सोयीचा ठरणार आहे.

वाशिम स्थानकावर मदत केंद्र -मोबाइलवर ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट कसे बुक करावे, याबाबत प्रवाशांना माहिती देण्यासाठी वाशिम रेल्वेस्थानकावर मदत केंद्र उभारण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी या ठिकाणी प्रवाशांना माहिती देऊन ऑनलाइन तिकीट काढण्याबाबत प्रेरित केले जात आहे. यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रवीण पवार, बुंकिग ऑफीस प्रमुख कांबळे, अजय कुमार यांच्यासह वाणिज्य विभागाचे सर्व कर्मचारी प्रवाशांना माहिती देण्यासाठी मदत केंद्रावर कार्यरत राहत आहेत.

मोबाइलवरच मिळणार तिकीटरेल्वे विभागाने विकसीत केलेले युटीस ॲप डाऊनलोड केल्यानंतर यावर मोफत नोंदणी करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट, सीजन तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, काढता येणार आहे. सीजन तिकीटासाठी आता दहा दिवसापूर्वी बुकींग करता येणार आहे. योग्य प्रवासाचे तिकीट काढल्यानंतर ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर मोबाइलवर तिकीट तयार होईल हे तिकीट प्रवासादरम्यान तिकीट निरीक्षकाला दाखवता येणार आहे.

प्रवाशांची रांगेतून सुटका व्हावी, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने ॲप विकसित केले आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांनी जनरल तिकीट घर बसल्या काढता येणार आहे. याबाबत वाशिम रेल्वे स्थानकावर प्रवाशांना माहिती दिली जात आहे. अधिक माहितीसाठी १३९ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा- प्रवीण पवार, मुख्य वाणिज्य विभाग प्रमुख, वाशिम 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी