शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी; टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:28 IST

Camel smuggling आता पुसदमार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी उंट नेले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

- शिखरचंद बागरेचालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उंटांची तस्करी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, आता पुसदमार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी उंट नेले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मध्यप्रदेशातील महू (इंदौर) येथून सहा उंटांचा कळप घेऊन योगेश हुकमचंद प्रजापती (महू) व भीमराव बुद्धू राठोड (मुखेड, नांदेड) हे दोघे रविवार, १४ मार्च रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास अमरावती - हैद्राबाद या चौपदरी महामार्गावरून कारंजा ते मंगरुळपीर मार्गाने जात असल्याचे आढळून आले. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यावेळी त्यांना उंट कोठून आणले आणि कुठे घेऊन जात आहात, असे विचारले असता मध्यप्रदेशातील महू (इंदौर) येथून आणले आणि अनसिंग (ता. वाशिम) येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. उंट २५ ते ३० हजारांत विकत घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, त्याबाबत त्यांच्याकडे कुठलाही अधिकृत पुरावा आढळला नाही. अनसिंग येथे कोणाकडे हे उंट देणार, या प्रश्नावर त्यांनी मेंढपाळ व लहान मुलांना खेळविण्यासाठी अनेक व्यावसायिक विकत घेण्यास इच्छुक असल्याची माहिती दिली. परंतु संबंधित दोघेही यावेळी घाबरलेले होते. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी सखोल चौकशी करून उंटांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी