शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्येही आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 18:14 IST

टेंपल गार्डनमध्ये अडीच कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सूर्य, चंद्र, तारे आदींसंबंधी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच कुतूहल लागून असते; मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे उभ्या आयुष्यात भल्याभल्यांना जमत नाही. ही उणिव भरून काढण्याचा प्रयत्न वाशिम नगर परिषदेने केला असून त्यासाठी नव्याने आकारास आलेल्या टेंपल गार्डनमध्ये अडीच कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे. हैद्राबाद येथील बिरला प्लनेटोरियम आणि मुंबई येथील नेहरू तारांगण अ‍ॅकेडमीच्या धर्तीवर वाशिममध्येही आता यामाध्यमातून नागरिकांना ब्रम्हांडाची अनुभूती घेता येणार आहे.वाशिम जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना अंतराळातील घडामोडींचे ज्ञान अवगत व्हावे, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशातून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वाशिम नगर परिषदेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारले असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत उच्च दर्जाचे होलोग्राफीक तंत्रज्ञान अवलंबून ब्रम्हांडातील ग्रह, उपग्रह, आकाशगंगेची अनुभूती करून दिली जाणार आहे. दरम्यान, या तारांगणाचे काम पूर्ण झाले असून ते मंगळवारपासून लोकांच्या सेवेत सुरू करण्यात येत आहे. 

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अडीच कोटी रुपयांच्या निधीतून वाशिम नगर परिषदेने तारांगणचे काम पूर्ण केले आहे. यामाध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही अंतराळ, ब्रम्हांडातील घडामोडींचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तारांगणमध्ये चार प्रोजेक्टरच्या सहाय्याने अगदी आरामात हे ज्ञान अवगत करण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. या तारांगणचे लोकार्पण मंगळवारी होत आहे. - वसंत इंगोलेमुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिम