शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

देपूळ येथील शाळा समितीच्या गठणाला कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:53 IST

देपूळ : जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी ५ नोव्हेंबर रोजी पत्र देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे नियमानुसार गठण करण्याच्या सुचना दिल्यानंतर देपूळ येथील जि.प. शाळेत त्याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क देपूळ : जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी ५ नोव्हेंबर रोजी पत्र देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे नियमानुसार गठण करण्याच्या सुचना दिल्यानंतर देपूळ येथील जि.प. शाळेत त्याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे पालकवर्गाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार करून या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. 

पूर्वी ग्रामपंचायत सरपंच हे जि.प.शाळा व्यवस्थापन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असायचे; परंतु शाळेत गटबाजी व राजकारण वाढून त्याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होवू लागला. यामुळे शाळेतून राजकारण हद्दपार करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने ८ वर्षांपूर्वी शाळा व्यवस्थापन समिती पालकामधूनच गठीत करण्याचे शासन परिपत्रक काढले. तेव्हापासून दोन वर्षे कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करणे सुरु झाले व ग्रामपंचायतचा हस्तक्षेप पूर्णपणे बंद झाला; परंतु देपूळ येथे या समितीच्या निवडीबाबत मतभेद निर्माण झाल्याने अडसर येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाºयांनी ५ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीस्तरावर पत्र पाठवून देपूळ येथे शाळा समिती गठीत करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर गत काही दिवसांपूर्वी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी पालकसभाही बोलावण्यात आली; परंतु या सभेत दोन गटांत वाद निर्माण झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीचा विषय प्रलंबितच राहिला. यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालक सभेचे आयोजन करून शाळा व्यवस्थापन समितीची गठीत करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणीही केली; परंतु अद्याप पोलीस संरक्षणही देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रार करून दखल घेण्याची मागणी केली आहे. या तक्रारीच्या प्रति विभागीय आयुक्त, शिक्षण मंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. 

 

शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी पालकसभा बोलावली. त्यावेळी दोन गटांत वाद झाला. आता पुन्हा सभेचे आयोजन करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली असून, पोलीस संरक्षण मिळाल्यानंतरच पालकसभा घेऊन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात येईल.-सुरेश उगलेमुख्याध्यापकजि.प. शाळा देपूळ

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा