शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘नॉन-कोविड’ रुग्णांना मिळणार घरपोच उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:05 IST

रुग्णांवर वेळेवर उपचार मिळावे याकरीता त्यामुळे आरोग्य विभागाने अ‍ॅक्शन प्लॅन आखला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाळ्यात ग्र्रामीण भागात साथरोग उद्भवल्यास तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये वैद्यकीय पथके स्थापन करून ‘नॉन-कोविड’ रुग्णांना घरोघरी जावून उपचार व औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी ३ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या आढावा सभेत केल्या होत्या. या सुचनेची अंमलबजावणी भोयणी, दादगाव येथून ५ जूनपासून सुरू झाली असून, यापुढेही अधिक दक्षता घेतली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.आगामी पावसाळ्याच्या काळात कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराचे रुग्णसुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रुग्णांवर वेळेवर उपचार मिळावे याकरीता त्यामुळे आरोग्य विभागाने अ‍ॅक्शन प्लॅन आखला आहे. ग्रामीण भागात व प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये वैद्यकीय पथके स्थापन करून ‘नॉन-कोविड’ रुग्णांना घरोघरी जावून उपचार व औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेषत: वृद्ध रुग्णांवर विशेष वॉच राहणार असून, वयोवृद्ध नागरिकांनीदेखील विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.साथरोग निर्माण झाल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, या पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार आढावा घेऊन आवश्यक तो औषधी साठा आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.दरम्यान, महानगर, परजिल्हा तसेच परराज्यातून येणाऱ्या मजूर, कामगारांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केली जात आहे. आतपर्यंत ७१ हजार मजूर, कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांची तपासणी फिव्हर क्लिनिक येथेच केली जात आहे. नागरिकांनीदेखील दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.  ताप, सर्दी, खोकला असणाºया रुग्णांची तपासणी मोहिमजिल्ह्यातील ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया व्यक्तींची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक असल्याने अशा व्यक्तींची सुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे.परराज्य, परजिल्ह्यातून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यापुढे अधिक दक्षता बाळगत प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया तसेच अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा विशेष वॉच असणार आहे.संकेतस्थळावर नोंदणी करण्याची सुविधाकोेरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया व्यक्तींची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक असतो. आशा व्यक्तींची सुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे असे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, तसेच ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया व्यक्तींसाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या संकेतस्थळावर संबंधित रुग्णांना आपली अचूक, संपूर्ण माहिती नोंदवावी लागणार आहे. माहिती दिशाभूल करणारी असल्यास फौजदारी कारवाईसंकेतस्थळावर प्राप्त झालेल्या माहितीची खातरजमा करून आवश्यकता असल्यास संबंधितांची आरोग्य तपासणी व उपचाराविषयी निर्णय घेण्यात येईल. दुसरीकडे भरलेली माहिती दिशाभूल करण्यासाठी देण्यात आल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाईदेखील केली जाईल. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताप, सर्दी, खोकला यापैकी कोणतेही लक्षण असल्यास स्वत:हून संकेतस्थळावर अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या