शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

संविधान वाचविण्यासाठी देशात असहयोग आंदोलन -   अबु आझमी   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 4:46 PM

संविधान व देश वाचविण्यासाठी  असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे,अशी माहिती समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशात लागू करण्यात आलेल्या सीएए हा नागरिकत्व सुधारणा कायदा यामुळे देशात अशांततेचे वातावरण असून या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचविण्यासाठी  असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे,अशी माहिती समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक शासकीय विश्राम गृह येथे समाजवादी पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अधिक माहिती देताना आमदार अबु आजमी पुढे म्हणाले की, देश सध्या अगदी नाजुक अवस्थेतुन जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू करून भाजपा प्रणित केंद्र शासनाने हिंदु-मुस्लिम  यांच्यात तेढ निर्माण  केल्याचे कार्य केले आहे. सर्व धर्म समभाव असलेल्या या देशात हिंदुच्या सोबत मुस्लिमांनी सुद्धा भरीव योगदान दिल्याचे इतिहासात नोंद आहे. मात्र, केंद्र शासनाने इतर जाती धर्मांना या कायदयाचा लाभ देवून मुस्लिमांना त्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठीच संपूर्ण देशात संविधान बचाव देश बचाव यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान यांनी नोट बंदीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. या निर्णयामुुळे देशातील मोठमोठया बँका रिकाम्या झाल्या आहेत. अनेक मोठया लोकांनी बँकाचे मोठे कर्ज उचलून देशातून पळून गेले आहे. या बाबीचा सर्व सामान्य लोकांना फटका बसत आहे. यावर चिंता करण्याऐवजी केंद्र शासन हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून देशात जाती वाद करीत आहे. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याबाबत पुस्तक काढण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवराय यांची तुलना कोणासोबतच करता येत नाही. तसेच तशी तुलना करणे म्हणजे शिवरायांना कमी लेखने होय असे सांगितले. छत्रपतींच्या राजवटीत आर्मी चिफ म्हणून मुस्लिम व्यक्तीवर जबाबदारी होती. असेही त्यांनी नमूद केले आहे. भारतीय जनता पार्टी व राष्टÑीय सेवंक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता व्यक्त केली. याप्रसंगी डॉ.शेख तसलिम, मोहंमद जावेद, बाबाभाई, आदी समवेत मोठया संख्येत समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीwashimवाशिम