शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
5
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
6
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
7
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
8
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
9
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
10
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
11
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
12
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
13
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
14
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
15
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
16
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
17
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
18
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
19
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
20
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

ना लसीकरण, ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत कॉन्टॅक्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाची गती मंदावली असल्याने आणि वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिल महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. एप्रिल महिन्यापासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या स्थिर असल्याचे दिसून येते. मात्र, त्याचबरोबर ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याचेही समोर येत आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान १५ जणांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश आहेत. त्या तुलनेत कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याचे दिसून येते. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. तथापि, गत एका महिन्यापासून मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्येदेखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाला गती देणेही आवश्यक ठरत आहे.

००००००००००

ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावे !

ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान १५ जणांची चाचणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिलेले आहेत.

ग्रामीण भागात दैनंदिन सरासरी १८० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत. या सूत्रानुसार ग्रामीण भागात दैनंदिन किमान २७०० ते ३००० कोरोना चाचणी होणे अपेक्षित आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्यातच दैनंदिन २८०० ते ३२०० दरम्यान चाचण्या होत असल्याचे दिसून येते.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या नियमाची अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामीण यंत्रणेला चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर किती जण संपर्कात आले होते, याची व्यवस्थित माहिती संबंधित रुग्णांकडून दिली जात नसल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये अडथळे येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

०००००००

मानोरा तालुक्यात टेस्टिंग घटले

मानोरा तालुक्यातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णसंख्याही कमी येत असल्याचे समोर येत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत मानोरा तालुक्यात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधादेखील व्यवस्थित नसल्याचे दिसून येते. वारंवार मागणी केल्यानंतर आता कुठे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. त्यातही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड नाही. शासन, प्रशासनाने मानोरा तालुक्याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

००००००

कोट बॉक्स

उपलब्ध लसीनुसार ग्रामीण व शहरी भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिलेल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत आहे. नागरिकांनीदेखील सहकार्य करून योग्य ती दक्षता घ्यावी.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

०००००००००००००००००००००००००

मालेगाव

तारीख चाचण्या रुग्ण

१ एप्रिल. १३८ १६

१० एप्रिल १३६ ४२

२० एप्रिल. २७७ ३३

३० एप्रिल ३५१ ६३

८ मे ५५७ ६१

...................

एकूण लसीकरण - २३,८६५

आरोग्य कर्मचारी - ७०२

फ्रंटलाईन वर्कर्स - १,२४६

ज्येष्ठ नागरिक - ११,३२९

४५ ते ५९ - १०,१४९

१८ ते ४४ - ४३९

००००००००००००००००००००

वाशिम

तारीख चाचण्या रुग्ण

१ एप्रिल. ३६२ १३१

१० एप्रिल ३६४ २२८

२० एप्रिल ६१९ ७३

३० एप्रिल ६२५ ११४

८ मे ८३६ १४५

...................

एकूण लसीकरण - ३३,४७६

आरोग्य कर्मचारी - १,०५०

फ्रंटलाईन वर्कर्स - २,९३३

ज्येष्ठ नागरिक - १४,२५५

४५ ते ५९ - १४,६६२

१८ ते ४४ - ५७६

००००००००००००००००००००

रिसोड

तारीख चाचण्या रुग्ण

१ एप्रिल : ३२७ ८८

१० एप्रिल : ३७९ १३६

२० एप्रिल : ३९९ १०५

३० एप्रिल : ४८९ ५५

०८ मे : १०६० ७६

...................

एकूण लसीकरण - १७,६५१

आरोग्य कर्मचारी - १६०

फ्रंटलाईन वर्कर्स - ३९२

ज्येष्ठ नागरिक - ८,६८१

४५ ते ५९ - ८,४१८

१८ ते ४४ - ...

०००००००००००००००००००००००००००

मंगरूळपीर

तारीख चाचण्या रुग्ण पॉझिटिव्ह

१ एप्रिल ३० ५

१० एप्रिल ३२ २

२० एप्रिल ४४ ३

३० एप्रिल २४ ३

८ मे ११२ २

...................

एकूण लसीकरण - २२,१६७

आरोग्य कर्मचारी - ५५१

फ्रंटलाईन वर्कर्स - १,६५०

ज्येष्ठ नागरिक - १७,९६०

४५ ते ५९ - १२२२

१८ ते ४४ - ७८४

००००००००००००००००००००००००००

मानोरा

तारीख चाचण्या रुग्ण पॉझिटिव्ह

१ एप्रिल ४८ १०

१० एप्रिल २३ ०९

२० एप्रिल ४० ११

३० एप्रिल १९८ ३४

८ मे २८५ ८०

...................

एकूण लसीकरण - ७,४४२

आरोग्य कर्मचारी - १,०३२

फ्रंटलाईन वर्कर्स - १,०८६

ज्येष्ठ नागरिक - ३,३६७

४५ ते ५९ - १,९५७

१८ ते ४४ - ५४३

००००००००००००००००००