शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या बाजारात ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:04 IST

Washim News जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, शेलुबाजार, अनसिंग येथे गुरांचा बाजार भरतो.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अनलाॅकच्या टप्प्यात आठवडी बाजार, गुरांच्या बाजाराला परवानगी मिळाली असून, वाशिमसह अन्य ठिकाणी गुरांचे बाजार भरत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरता गुरांच्या बाजारात मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे अपेक्षीत आहे. परंतू, याकडे प्रशासनासह शेतकरी, व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, शेलुबाजार, अनसिंग येथे गुरांचा बाजार भरतो. काही ठिकाणी सॅनिटायझरचा वापर होतो तर अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा वापर होत नाही. बाजारात येणारे सर्वच जण मास्क वापरत नसल्याचे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येते. गुरांच्या बाजारातील उलाढालही सध्या कमी झाल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले. लाॅकडाऊनपूर्वी जास्त उलाढाल होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुरांच्या बाजारात सॅनिटायझरची व्यवस्था कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजाराच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आल्याचे मालेगाव, वाशिम येथे दिसून आले.मास्क किंवा रुमाल तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. तथापि याकडे काही शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

अनलाॅकच्या टप्प्यात गुरांच्या बाजाराला परवानगी मिळालेली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील. प्रत्येकाने दक्षता घ्यावी.- षण्मुगराजन एस., जिल्हाधिकारी

  यंदा कोरोनामुळे पशुपालक, शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येते. कोरोनापूर्वी म्हैस, बैलाच्या किंमती चांगल्या होत्या. सध्या म्हैशीच्या किंमतीत घट आल्याचे दिसून येते. किंमती कमी असल्याने याचा परिणाम उलाढालीवर होत आहे.    

    - गाैतम भगत, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या