शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

गावतलावांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी शासनाकडून निधीच मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:12 IST

१०० पेक्षा जास्त प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली असतानाही, नियमित देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीच प्राप्त होत नाही.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत जवळपास ४५० जलसाठ्याचे प्रकल्प असून, यापैकी १०० पेक्षा जास्त प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली असतानाही, नियमित देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून पुरेशा प्रमाणात निधीच प्राप्त होत नाही. मार्च २०२० मध्ये पाठविलेला २९.९९ कोटींचा निधी प्रस्तावही शासनस्तरावर लालफितशाहीत अडकला आहे. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी कवठळ परिसरातील दोन गाव फुटल्यानंतर, प्रशासकीय यंत्रणेतर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले.जि.प.जलसंधारण विभागांतर्गत गावतलाव, कोल्हापूरी बंधारे, लघु प्रकल्प आदी प्रकारातील जवळपास ४५० जलसाठे प्रकल्प आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे तलाव फुटून नुकसान होऊ नये म्हणून उन्हाळयातच आवश्यक त्या तलावांची देखभाल, दुरूस्ती होणे आवश्यक आहे. प्रकल्पाची आयुर्मर्यादा साधारणत: ५० वर्षांची असते. जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक प्रकल्पांची आयुर्मर्यादा संपलेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण आणि इतर १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा निधी आवश्यक असून, तसा प्रस्तावही जि.प. प्रशासनाने मार्च २०२० मध्ये शासनाकडे पाठविला. सध्या हा प्रस्ताव शासनस्तरावर लालफितशाहीत अडकला आहे. जिल्ह्यात १० आॅगस्ट रोजी कवठळ परिसरातील दोन गावतलाव फुटल्याने संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी निधी प्रस्ताव निकाली निघणे आवश्यक आहे.

कवठळ परिसरात पंचनामे सुरूमंगरूळपीर : तालुक्यातील कवठळ येथे १० आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे दोन गावतलाव फुटल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १२ सप्टेंबरपासून प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त शेतजमिनीच्या पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले. दोन्ही तलाव हे २८ वर्षे जुने असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पिकांचे नुकसान झाले तसेच जमीनीसुद्धा खरडून गेल्याने रब्बी हंगामसुद्धा धोक्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे.वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण व इतर १०५ कामांसाठी २९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून वरिष्ठांकडे यापूर्वीच सादर केला.- ए.एम. खानजिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प.

 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर